या चित्रपटाची कथा पाहून थिएटरमध्ये प्रत्येकजण रडला, आजही नाव ऐकलं तरी डोळ्यात येते पाणी
1981 मधील रोमँटिक चित्रपट, ज्याची कथा पाहून प्रत्येकजण थिएटरमध्ये रडत होता. लोक चित्रपट पाहण्यासाठी थिएटर बाहेर करायचे गर्दी. आजही बघताना डोळ्यात येते पाणी.

भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर प्रेमकथांपैकी एक मानल्या जाणाऱ्या 1981 मधील ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटाबाबत अभिनेत्री रती अग्निहोत्री यांनी अनेक रंजक आणि धक्कादायक आठवणी शेअर केल्या आहेत. दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या या चित्रपटाने कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती.

अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत रती यांनी सांगितले की, विशाखापट्टणममध्ये चित्रपटाचे चित्रीकरण अत्यंत कठीण परिस्थितीत झाले होते. भीषण उष्णता, खडकाळ परिसर आणि अनवाणी चालण्यामुळे कलाकार व तंत्रज्ञांच्या पायांना फोड आले होते.

रती यांनी आणखी एक खुलासा करताना सांगितले की, चित्रपटाचे शूटिंग काही महिन्यांत पूर्ण झाले होते. मात्र सुरुवातीला कोणताही वितरक हा चित्रपट विकत घेण्यास तयार नव्हता. नंतर प्रदर्शित झाल्यानंतर ‘एक दूजे के लिए’ने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवत ब्लॉकबस्टर ठरला.

चित्रपटातील काही गाजलेल्या दृश्यांबाबत बोलताना रती म्हणाल्या की, त्यावेळी त्या खूप लहान होते आणि दिग्दर्शकांच्या सूचनांवर पूर्णपणे अवलंबून होते. तमिळ भाषेचे ज्ञान मर्यादित असूनही के. बालचंदर यांनी त्यांना प्रत्येक प्रसंग समजावून सांगितला. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच त्यांनी सर्व सीन साकारले.

चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना रती भावूक झाल्या. त्यांनी सांगितले की, आजही प्रेक्षक ‘एक दूजे के लिए’ आणि त्यांच्या ‘सपना’ या भूमिकेला विसरलेले नाहीत असं त्या म्हणाल्या. मात्र, आजही हा चित्रपट पाहताना प्रत्येक व्यक्ती रडतो.