Photo | हैदराबाद वरचढ ठरणार की बंगळुरु विजयश्री पटकावणार? दिल्लीशी कोणाची गाठ पडणार?

- सलग 4 मॅच गमावून देखील रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुची टीम आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहचली आहे. आज (शुक्रवारी) रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु सनरायजर्स हैदराबादशी भिडणार आहे.
- बंगळुरु आणि हैदराबादला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मॅच जिंकावी लागेल. या मॅचमध्ये जी कोणती टीम हारेल त्या टीमवर स्पर्धेबाहेर जाण्याची नामुष्की येईल. तर जिंकण्याऱ्या टीमला दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करावे लागणार आहेत.
- गेल्या 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलेल्या आरसीबीसाठी हैदराबादविरूद्ध पुनरागमन करणं, हे मोठं आव्हान असेल.
- दुसरीकडे हैदराबादची टीम आत्मविश्वास गमावलेल्या आरसीबीला लोळवण्यासाठी सज्ज आहे. वॉर्नर आणि साहाची आक्रमक बॅटिंग हैदराबादसाठी प्लस पॉइंट असणार आहे. आम्ही सांघिक कामगिरीच्या जोरावर आजची मॅच नक्की जिंकू, असा विश्वास वृद्धिमान साहाने व्यक्त केलाय.
- हैदराबादविरुद्धची मॅच जिंकायची असेल तर बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहली आणि तडाखेबाज फलंदाज ए.बी.डिव्हिलिअर्सला मोठी खेळी करावी लागेल आणि संघाला विशाल धावांचा डोंगर रचावा लागेल.
- बंगळुरुचे जलदगती गोलंदाज नवदीप सैनी आणि ख्रिस मॉरिस देखील चांगल्या फॉर्मात आहेत.
- दुसरीकडे हैदराबादचे संदीप शर्मा आणि त्यागराज नटराजन देखील विकेट टेकर मानले जातात. मोक्याच्या क्षणी विकेट घेण्यात दोघेही माहीर मानले जातात. त्यामुळे आजची मॅच जिंकून दिल्लीची कोण लढणार, हे पाहणे महत्त्वाचं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us