
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. या यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटण्यासाठी लोक येत आहेत.

भारत जोडो यात्रे दरम्यान काही चिमुकलेही राहुल गांधी यांना येऊन भेटत आहेत. याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

लहान मुलंही या यात्रेत सहभागी होत आहेत.

हे दोन फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. राहुल गांधी लहान मुलीचे डोळे पुसताना हा फोटो टिपण्यात आलाय. तर एका चिमुरड्याच्या डोक्यावर हात ठेवलेला फोटो अनेकांनी लाईक केलाय.

एका तरूणीला सही देताना राहुल गांधी...

एका लहानगीने राहुल गांधी यांना इंदिरा गांधी यांचा फोटो भेट दिला.