Poonam Pandey: वेश्याव्यवसाय कायदेशीर करा; पुनम पांडेच्या मागणीने मोठी खळबळ

Poonam Pandey: पूनम पांडे बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठी आणि वादग्रस्त विधानांसाठी खास ओळखली जाते. पूनमने आता अॅडल्ट कंटेंटबाबत एक मोठे विधान केले आहे. तिने भारतात वेश्याव्यवसाय कायदेशीर करा अशी मागणी केली आहे.

| Updated on: Sep 06, 2026 | 12:22 PM
1 / 5
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे बोल्ड आणि वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असते. आता पूनम पांडेने अॅडल्ट कंटेंटबाबत केलेल्या नव्या विधानाने एकच खळबळ माजली आहे. अभिनेत्रीने म्हटले आहे की वेश्याव्यवसाय भारतात कायदेशीर करावा.

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे बोल्ड आणि वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असते. आता पूनम पांडेने अॅडल्ट कंटेंटबाबत केलेल्या नव्या विधानाने एकच खळबळ माजली आहे. अभिनेत्रीने म्हटले आहे की वेश्याव्यवसाय भारतात कायदेशीर करावा.

2 / 5

पूनम पांडेने आपले बोल्ड आणि अॅडल्ट व्हिडिओ एक प्रकारची ‘सोशल सर्व्हिस’ असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्रीने हाही दावा केला की तिच्या बोल्ड व्हिडीओंमुळे विशेषतः पुरुषांचे डिप्रेशन आणि ताण कमी करण्यास मदत होऊ शकते.

3 / 5

आरव्हीसीजे मूव्हीजला दिलेल्या मुलाखतीत पूनम पांडेने बोल्ड व्हिडिओंना ‘खूप मोठी सोशल सर्व्हिस’ म्हटले आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली, लोक खूप ताणात असतात, विशेषतः पुरुष ताणाने ग्रस्त आहेत. अशा वेळी जर माझा एक व्हिडिओ त्यांचा ताण कमी करण्यास मदत करत असेल, तर त्यात काय गैर आहे? बाहेर गुन्हेगारीचा दर किती वाढत आहे. भारतात वेश्याव्यवसाय कायदेशीर करावा, यामुळे महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना कमी होतील.

4 / 5

पूनम पांडेने हेही सांगितले की आपल्या बोल्ड कंटेंटमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग आणि टीका सहन करावी लागली आहे. इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीज आणि तिचे स्वतःचे मित्रही तिच्यावर टीका करतात. पण खासगीमध्ये स्वत: व्हिडीओ पाहतात.

5 / 5

ट्रोलर्सना उत्तर देताना पूनम पांडे म्हणाली की अनेक कमेंट्स वाचून तिला खूप राग आला. तिने कबूल केले की कधीकधी तिचे मन जोरदार उत्तर देण्याचा करते, पण नंतर ती स्वतःला शांत करते, जेणेकरून आपला स्टँडर्ड खराब होऊ नये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us