Post Office Money Doubble Schemes : पैसे डबल करणारी पोस्ट ऑफिसची स्किम! 1 हजार रूपयांपासून गुंतवणूक आणि मिळवा दुप्पट रक्कम

आजच्या काळात पैसे कमावण्यासोबतच त्यांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची अनेकांना भीती वाटते. अशा वेळी सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची ही स्किम पैसाच पैसा देणारी आहे.

| Updated on: Oct 31, 2026 | 6:17 PM
1 / 7
या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे यात गुंतवलेली ठराविक रक्कम ठराविक कालावधीनंतर दुप्पट होते. विशेष म्हणजे, या योजनेत फक्त 1000 पासून गुंतवणूक करता येते.

या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे यात गुंतवलेली ठराविक रक्कम ठराविक कालावधीनंतर दुप्पट होते. विशेष म्हणजे, या योजनेत फक्त 1000 पासून गुंतवणूक करता येते.

2 / 7

आजच्या काळात पैसे कमावण्यासोबतच त्यांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची अनेकांना भीती वाटते. अशा वेळी सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची ही स्किम पैसाच पैसा देणारी आहे.

3 / 7

किसान विकास पत्र म्हणजेच KVP ही केंद्र सरकारची लघुबचत योजना आहे. सध्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी या योजनेवर वार्षिक 7.5 टक्के व्याजदर दिला जात आहे. या व्याजदरानुसार गुंतवलेली रक्कम 115 महिन्यांत म्हणजेच 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट होते. त्यामुळे ज्यांना दीर्घकाळासाठी पैसे गुंतवून ठेवायचे आहेत, त्यांच्यासाठी हा एक पर्याय आहे.

4 / 7

समजा, तुम्ही या योजनेत 1 लाख रूपये गुंतवलेत तर मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 2 लाख रूपयांची गुंतवणूक केल्यास 4 लाख रूपये मिळू शकतात.म्हणजेच गुंतवणूकीची रक्कम कितीही असली तरी सध्याच्या व्याजदरानुसार ती दुप्पट होण्यासाठी 115 महिन्यांचा कालावधी लागतो.

5 / 7

या योजनेत किमान 1,000 रूपये गुंतवता येतात. त्यानंतर 100 रूपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे,गुंतवणूकीची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. त्यामुळे आपल्या आर्थिक क्षमतेनुसार कितीही रक्कम गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. एकट्या व्यक्तीच्या नावाने किंवा जॉईंट खात्याच्या स्वरुपातही खाते उघडता येतं. अल्पवयीन मुलांच्या नावानेही नियमानुसार खाते उघडण्याची सुविधा आहे.

6 / 7

आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुदत पूर्ण होण्याआधी पैसे काढता येतात का ? : तर या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर अडीच वर्षांनंतर काही ठराविक अटींनुसार खाते बंद करून पैसे काढता येतात. तसेच या प्रमाणपत्राचा वापर कर्जासाठी तारण म्हणूनही करता येऊ शकतात.

7 / 7

मात्र या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. 7.5 % सध्याचा व्याजदर असून सरकार दर तिमाहीला लघूबचत योजनांचे दर जाहीर करते. तुम्ही प्रमाणपत्र खरेदी करता त्यावेळी लागू असलेला व्याजदर आणि दुप्पट होण्याचा कालावधी तुमच्या गुंतवणूकीसाठी निश्चित होतो. त्यामुळे गुंतवणूकीचा निर्णय घेण्याआधी कराचे नियमही समजून घ्या.,

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us