
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीममध्ये गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या योजनांमध्ये वेगळा व्याज दर मिळतो. एक वर्षाच्या गुंतवणूकीवर 6.9 टक्के, दोन वर्षावर 7 टक्के, तीन वर्षावर 7.1 टक्के आणि पाच वर्षाच्या गुंतवणूकीवर 7.5 टक्के व्याज मिळते. म्हणजे आपली गरज आणि टर्मनुसार गुंतवणूक करुन कमाई वाढवू शकता.

जर, तुम्ही 5 वर्षाच्या टर्मवर 5 लाख रुपयाची गुंतवणूक करणार असाल, तर 7.5 टक्के व्याजदराने 5 वर्षात 2,24,974 रुपये व्याज मिळेल. मॅच्योरिटीला एकूण रक्कम 7,24,974 रुपये असेल. म्हणजे फक्त व्याजातून लाखोंची कमाई करु शकता. ते ही कुठली रिस्क न घेता. ही स्कीम तुमच्यासाठी कमाल करु शकते.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीम 100% सुरक्षित आहे. कारण या योजनेला भारत सरकारचं समर्थन आहे. गुंतवणूकदारांना आपले पैसे गमावण्याचा कुठलाही धोका नसतो. त्याशिवाय स्कीममध्ये कमीत कमी गुंतवणूक 1000 रुपये आहे. जास्तीत जास्त गुंतवणूकीची कुठलीही मर्यादा नाही. त्यामुळे प्रत्येक जण या गुंतवणूक योजनेत सहभागी होऊ शकतो.

या स्कीममध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास इनकम टॅक्स कायदा 1961 च्या सेक्शन 80 C अंतर्गत टॅक्स बचतही करु शकता. म्हणजे फक्त व्याजावर कमाई नाही, तर टॅक्सी बचतीचा सुद्धा फायदा मिळेल.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीममध्ये तुम्ही सिंगल किंवा जॉइंट अकाऊंट ओपन करु शकता. 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी सुद्धा त्यांचे नातेवाईक अकाऊंट उघडू शकतात. व्याज वार्षिक आधारावर जमा होते. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट ओपन करु शकता.