Lalit Prabhakar: माझे बाबा स्टेशनवर झोपायचे, उल्हासनगरमध्ये 1RK खोली… ‘प्रहार’ अभिनेता ललित प्रभाकरचा प्रचंड संघर्ष
Prahaar Actor Lalit Prabhakar: मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये त्याच्या कुटुंबियांच्या संघर्षाची कथा सांगितली आहे. हे ऐकून अक्षरश: डोळ्यात पाणी येईल.

सध्या सर्वत्र मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकरची चर्चा सुरु आहे. त्याने प्रहार सिनेमात साकरलेली भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आज लाखो रुपये कमावणाऱ्या ललितने कठीण परिस्थितीवर मात करत इथवरचा पल्ला गाठला आहे. स्वत:त्याने एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.
ललित प्रभाकरने एका मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. तो म्हणाला होता की, "दर दोन वर्षांनी माझी शाळा बदलायची. माणसे बदलत राहिली, वेगवेगळ्या लोकांबरोबर ओळखी झाल्या होत्या. त्यामुळे मी कुठेच सेटल झालो नाही. पण जास्त माणसे, त्यांचे स्वभाव बघायला मिळायचे. यामुळे अनुभवाची कमतरता जाणवली नाही.
पुढे तो म्हणाली, मी चांगले वाईट, भयानक ते थ्रिल असे अनेक प्रकारचे अनुभव आजवर घेतले आहेत. याला कारणीभूत आहे ते म्हणजे माझे आजूबाजूचे वातावरण आणि माणसे. त्यांच्यामुळेच मी मोठा होत होतो. माझ्या आईबाबांचे नाव मी आधी घेईन. दोघंही खरं तर शेतकरी आहेत. बाबांच्या लहानपणीच माझे आजोबा वारले होते. अशा परिस्थितीत बाबांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केले.
ललितचे वडिल हे ते गावावरुन मुंबईला आले होते. त्यांच्या संघर्षाविषयी बोलताना तो म्हणाला की, लग्नानंतर आईला शिकवले. एक काळ असा होता जेव्हा आमच्याकडे राहायला घर नव्हते. ते अक्षरश: स्टेशनवर झोपायचे. या सगळ्या परिस्थितीत त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले आहे. स्वतःची प्रोग्रेस केली जी मी खूप जवळून बघितली आहे.
पुढे तो म्हणाला, उल्हासनगरला आमचं घर हे वन रुम किचन होते. तिथेच मोरी, बाथरुम सगळे एकामध्येच होते. तिथपासून ते आतापर्यंतचा त्यांचा प्रवास मी बघितला आहे. मला वाटते मी त्याच्या १० टक्केही संघर्ष केलेला नाही किंवा तशी अचिव्हमेंटही मिळवलेली नाही. त्यांचा प्रवास खरंतर अशक्य आहे. त्यांनी असे उदाहरण माझ्यासमोर ठेवलेय ज्याच्या पलीकडे मी जाऊच शकत नाही. त्यांनी एकमेकांना साथ देत स्वतःला घडवलं.
ललित सुरुवातीला उल्हासनगरमध्ये राहात होता. नंतर तो बदलापूरला एका चाळीत आला. त्यानंतर दुसऱ्या मोठ्या चाळीत गेलो. तिथून इमारतीत शिफ्ट झाला. वन बीएचके पासून टू बीएचके, मग थ्री बीएचके आणि नंतर स्वतःचे घर असा ललितचा प्रवास आहे.