Adinath Kothare: आनंदाची बातमी! प्राजक्ता माळी आणि आदिनाथ कोठारे आले एकत्र, सिनेमाची आतुरता
Prajakta Mali and Adinath Kothare: अभिनेत्री प्राजक्ता माळीने एका मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली आहे. ती आगामी सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारेसोबत दिसणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता आदिनाथ कोठारे हे कायमच प्रेक्षकांची मने जिंकत असतात. आता हे दोघे एकत्र आल्याचे समोर आले आहे. प्राजक्ता आणि आदिनाथ यांना एकत्र पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी...
आदिनाथ कोठारे आता ‘गौरी’ या आगामी मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी मध्यवर्ती भूमिका साकारणार असून, निर्माती म्हणूनही त्या या प्रकल्पाची जबाबदारी सांभाळत आहेत. महिलाकेंद्रित विषय या सिनेमात मांडला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.
‘गौरी’ या चित्रपटात केवळ एका स्त्रीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्याभोवती फिरणारी कथा नसून न्यायासाठी एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या बाजूने उभे राहण्याची गरज आणि काही प्रसंगी एक स्त्रीच न्याय मिळवून देऊ शकते, हा विचार मांडणारी आहे.
“आजूबाजूला सर्रास घडणाऱ्या स्त्रियांवरील अन्यायाविषयी हा चित्रपट अतिशय संवेदनशीलपणे भाष्य करणार आहे,” असे प्राजक्ता माळी म्हणाली.
गौरी या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हिरावत, श्रेयांस हिरावत, प्राजक्ता माळी आणि श्वेता माळी यांनी केली आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काही दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे.