Prajakta Mali : तुझ्या विचारांच्या प्रेमात..! प्राजक्ता माळीची खास पोस्ट चर्चेत, फोटो शेअर करत…

अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच एक पोस्ट शेअर करत फोटो टाकला आहे. त्यावर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स आल्यात. या पोस्टद्वारे प्राजक्ताने खूप कौतुक केलंय, कोण आहे ती व्यक्ती ?

| Updated on: Sep 15, 2026 | 6:09 PM
1 / 7
टीव्ही आणि चित्रपट दोन्हीत लीलया काम करणारी, सुंदर हास्याने चाहत्यांचं मन मोहून घेणारी मराठी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असलेली प्राजक्ता उद्योजिकाही आहे. तिचे प्रोजेक्टस, काम,  आयुष्याताली खास क्षण, हे ती फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.  ( All Photos : Instagram/ Prajaktta Mali )

टीव्ही आणि चित्रपट दोन्हीत लीलया काम करणारी, सुंदर हास्याने चाहत्यांचं मन मोहून घेणारी मराठी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असलेली प्राजक्ता उद्योजिकाही आहे. तिचे प्रोजेक्टस, काम, आयुष्याताली खास क्षण, हे ती फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. ( All Photos : Instagram/ Prajaktta Mali )

2 / 7

लवकरच ती ललित प्रभाकरसोबत पुन्हा काम करताना दिसणार आहे. तसंच तिच्या नव्या चित्रपटाचही काम सुरू असून त्याचे काही फोटोही तिने शेअर केले होते.तिच्या लग्नाबद्दल, जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असते. प्राजक्ताने अजून लग्न केलेलं नसलं तरी होणाऱ्या जोडीदाराबद्दल ती अनेकदा बोलली आहे. वैयक्तिक आयुष्यातील काही खुलासे देखील तिने केले होते. आता प्राजक्ताने नुकतीच एक पोस्ट केली असून त्यासोबत तिने खास मेसेजही लिहीला.

3 / 7

तिने नुकतंच “लग्नपंचमी”. हे नाटकं पाहिलं. यावेळी ललित प्रभाकर सुद्धा तिच्यासोबत होता. नाटकांनंतर सर्व कलाकारांसोबतचा फोटो प्राजक्ताने शेअर करत या नाटकासाठी खास फोस्ट लिहीत तिने सर्वांचं भरभरून कौतुक केलंय.

4 / 7

आज एक सुंदर नाटक पाहिलं.., “लग्नपंचमी”. 🎯 लग्न झालेल्यांनी, लग्न करण्याची इच्छा असलेल्यांनी, लग्न न करण्याची इच्छा असलेल्यांनी… थोडक्यात सर्वांनी हे नाटक पहावं. हे नाटक सर्व वयोगटातील प्रेक्षकांचं मनोरंजन करेल हे निश्चित, असं पार्जक्ताने पोस्टमध्ये म्हटलंय.

5 / 7

मधू ताई नाटकाची लेखिका, निर्माती आणि अभिनेत्री; ह्या तिन्ही बाजू इतक्या सुंदररित्या सांभाळतेस.. हे अतिशय प्रेरणादायी आहे. आणि तूझ्या विचारांच्या प्रेमात तर मी फार पूर्वीपासून आहेच. आज नाटकातून पुन्हा ते अनुभवायला मिळाले.♥️ स्वप्नील जोशी तूमचा रंगमंचावरचा नैसर्गिक वावर पाहून मी थक्क झालेय.., it’s a treat to watch you live on stage 😍, असं लिहीत तिने भरभरून तारीफ केली.

6 / 7

शेवटी तिने विदुला चौघुले आणि मुकेश जाधव यांच्याबद्दलही कौतुकोद्गार काढत, ते खूपच सुंदर काम करत आहेत, असं लिहीलंय.

7 / 7

तिच्या या पोस्टला भरभरून लाईक्स मिळाल्या असून कमेंट्सचाही वर्षाव झालाय. अनेकांनी नाटकाचं कौतुक केलं, तर काही चाहत्यांनी प्राजक्ता, ललित आणि मधुगंधा हे एक्तर एकाच फ्रेममध्ये दिसल्याने आनंद व्यक्त केलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us