Prajakta Mali: हा काही जोक आहे का?…प्राजक्ता माळी क्रांती रेडकरबद्दल असं का म्हणाली? पोस्टने वेधलं लक्ष
Prajakta Mali Post: अभिनेत्री प्राजक्ता माळीने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने क्रांती रेडकरबद्दल बरंच काही म्हणाली आहे. आता ती नेमकं काय म्हणाली ते पाहा,...

अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकरच्या आगामी चित्रपट 'मैत्रेया' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रमोशनही सुरु आहे.
आता या चित्रपटाचा ट्रेलरला पाहून अभिनेत्री प्राजक्ता माळीने क्रांतीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ता म्हणाली की, "क्रांती ताई तू मला वेगवेगळ्या प्रकारे सातत्याने प्रेरणा देत आली आहे. हा नवा चित्रपट त्याचेच आणखी एक उदाहरण आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या सिनेसृष्टी दिग्दर्शक म्हणून तू स्वत:ची भक्कम जागा निर्माण केली आहेस."
"दोन लहान जुळ्या लेकींची जबाबदारी अतिशय उत्तमरित्या सांभाळत, ही साधी गोष्टी नाही, ही केवळ सुपरह्युमनच असू शकते, हा काही जोक नाही" असं प्राजक्ता माळी म्हणाली.
प्राजक्ताने केलेल्या कौतुकावर क्रांती रेडकरनेही दाद दिली. म्हणाली, "प्राजक्ता नेहमीच चांगल्या गोष्टीला मनापासून पाठिंबा देते"
क्रांतीच्या मैत्रेया चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला तिचे पती समीर वानखेडे आणि दोन मुलीही हजर होत्या.