Adinath Kothare: त्यावेळी आम्ही मतभेद विसरुन… आदिनाथ कोठारेसाठी प्राजक्ता माळीची पोस्ट
Adinath Kothare: गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता आदिनाथ कोठारे एकत्र काम करत आहेत. आता प्राजक्ताने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता आदिनाथ कोठारे हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. दोघेही एकत्र दिसणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. आता प्राजक्ताने केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आदिनाथ कोठारेसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताने फोटो शेअर करत, त्यावेळी, आम्ही #गौरी चित्रपट प्रकल्पासंदर्भात जवळपास प्रत्येक गोष्टीवर मतभेद विसरुन काम करायचे ठरवले. तयार रहा, आदिजी... हा प्रवास नक्कीच एक रोलर कोस्टर राईड असणार आहे या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
पुढे ती म्हणाली की, तुमच्यासारख्या एका दिग्गज अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शकासोबत जोडले गेल्याचा खूप आनंद आहे. ज्याला चित्रपट निर्मितीच्या प्रत्येक पैलूची माहिती आहे आणि ज्यांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणे खूप सोपे जाते. सोन्यासारख्या माणसांसोबत बावनकशी सोन्यासारखा चित्रपट करायला मिळतोय, कृतज्ञ आहे.
आदिनाथ कोठारे आणि प्राजक्ता माळीचा गौरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.