राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात अनेक मराठी कलाकारांचा जाहीर प्रवेश; अजित पवारांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग सेलचे राज्यप्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारानं ही बैठक पार पडली. (Public admission of many Marathi artists in the NCP's film and cultural department)

1/5
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागात अभिनेत्री सुरेखा कुडची, अभिनेते संभाजी तांगडे, गीतकार-लेखक बाबासाहेब सौदागर यांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.

2/5
यावेळी अभिनेत्री सुरेखा कुडची यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी, अभिनेते संभाजी तांगडे यांची मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी आणि गीतकार लेखक बाबासाहेब सौदागर यांची खान्देश विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

3/5
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग सेलचे राज्यप्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारानं झालेल्या या बैठकीला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, सांस्कृतिक पुणे विभागाच्या प्रमुख अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेत्री मेघा घाडगे, अभिनेते गिरीश परदेशी, अभिनेता प्रियदर्शन जाधव, गायिका वैशाली माडे, अभिनेते डॉ. सुधीर निकम, निर्माते मंगेश मोरे, निर्माते संतोष साखरे आणि लेखक दिग्दर्शक कौस्तुभ सावरकर उपस्थित होते.

4/5
याशिवाय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते आणि माजी आमदार श्रीनिवासराव ऊर्फ बापूसाहेब देशमुख (गोरठेकर) यांनी प्रवेश केला.

5/5
यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI