Raja Shivaji : बजेटच्या इतक्या जवळ पोहोचली ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची कमाई; 12 व्या दिवशी किती कमावले?

Raja Shivaji Box Office Collection : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. लवकरच हा चित्रपट बजेटचा आकडा वसूल करण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत किती कमाई झाली, ते जाणून घ्या..

| Updated on: May 13, 2026 | 8:42 AM
1 / 5
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित 'राजा शिवाजी' या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता रितेश देशमुखने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिकासुद्धा साकारली आहे. 1 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 12 व्या दिवशी किती कमाई केली, ते जाणून घेऊयात..

2 / 5
'राजा शिवाजी' या चित्रपटात रितेश देशमुखसह संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, जिनिलिया डिसूझा, सचिन खेडेकर, फरदीन खान, बोमन इराणी अशी कलाकारांची मोठी फौजच पहायला मिळते. इतकंच नव्हे तर सलमान खाननेही यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा एकूण बजेट जवळपास 75 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं आहे.

3 / 5
'राजा शिवाजी' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपये कमावल्यानंतर प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी 3.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर नवव्या दिवशी 5.60 कोटी रुपये, दहाव्या दिवशी 6.80 कोटी रुपये आणि अकराव्या दिवशी 2.40 कोटी रुपयांची कमाई झाली.

4 / 5
'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'राजा शिवाजी' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या बाराव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी 2.50 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण कमाईचा आकडा 73.15 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कमाईचा हा आकडा बजेटच्या आकड्यापेक्षा फक्त दोन कोटी रुपयांनी कमी आहे. त्यामुळे बुधवारी हा आकडा पार करेल, अशी शक्यता आहे.

5 / 5
'राजा शिवाजी' या चित्रपटाची शूटिंग सातारा, पुणे, नाशिक, महाबळेश्वर आणि मुंबई याठिकाणी झाली. रितेश देशमुखच्या करिअरमधील हा सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो यावर काम करत होता. रितेश देशमुखच्या आधी रवी जाधव आणि नागराज मंजुळे हे चित्रपट दिग्दर्शित करणार होते. परंतु काही कारणास्तव ते शक्य झालं नाही, तेव्हा रितेशनेच दिग्दर्शनाची धुरा आपल्या हाती घेतली.

Follow Us