राम चरण-जान्हवी कपूरच्या डान्स स्टेप पाहून भडकले लोक, केला अश्लीलतेचा आरोप

राम चरण-जान्हवी कपूरचं 3 मिनिट 56 सेकंदाचं गाणं पाहून भडकले लोक. डान्स स्टेप पाहून नेटकऱ्यांनी केले अश्लीलतेचे आरोप.

| Updated on: May 26, 2026 | 12:10 PM
1 / 5
राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या आगामी ‘पेड्डी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी भोपालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका म्युझिक इव्हेंटमध्ये ‘हेल्लाल्लालो’ हे गाणे लॉन्च करण्यात आले.

राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या आगामी ‘पेड्डी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी भोपालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका म्युझिक इव्हेंटमध्ये ‘हेल्लाल्लालो’ हे गाणे लॉन्च करण्यात आले.

2 / 5

मात्र गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्यावर टीकेची झोड उठली असून, अनेक नेटकऱ्यांनी या गाण्यावर अश्लीलतेचे आरोप केले आहेत. ‘पेड्डी’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटात राम चरण, जान्हवी कपूर आणि श्रुती हासन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

3 / 5

भोपालमध्ये पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात चित्रपटाच्या टीमने ‘हेल्लाल्लालो’ हे गाणे सादर केले. ऊर्जा आणि डान्सने भरलेल्या या गाण्यात तिन्ही कलाकारांचे ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाले.

4 / 5

मात्र गाणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याविरोधात नाराजी व्यक्त होऊ लागली. अनेकांनी गाण्यातील डान्स स्टेप्स आणि चित्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामधील अभिनेत्रीच्या डान्स मूव्ह्जवर काही युजर्सनी टीका करत, महिलांचे चित्रण आक्षेपार्ह पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप केला.

5 / 5

एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, तेलुगू इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारच्या स्वस्त डान्स नंबरचे प्रमाण वाढत आहे. ‘पेड्डी’मधील हे गाणे पाहिल्यानंतर त्यातील डान्स मूव्ह्ज अतिशय अश्लील वाटल्या. महिलांना केवळ आकर्षणाचे साधन म्हणून दाखवले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us