या दिवशी हैदराबादमध्ये होणार रश्मिका-विजयच्या लग्नाचे रिसेप्शन, कोण राहणार उपस्थित?

नुकतेच रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा विवाहबंधनात अडकले आहेत. या खास सोहळ्यानंतर आता हैदराबादमध्ये रिसेप्शन पार्टींचं आयोजन करण्यात आलं आहे.

| Updated on: Feb 27, 2026 | 6:29 PM
1 / 5
मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय स्टार जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे 26 फेब्रुवारी रोजी राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकले. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या या विवाहसोहळ्याचा थाट उदयपूरमध्ये पाहायला मिळाला.

मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय स्टार जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे 26 फेब्रुवारी रोजी राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकले. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या या विवाहसोहळ्याचा थाट उदयपूरमध्ये पाहायला मिळाला.

2 / 5

राजस्थानातील उदयपूर येथे सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी या दोघांनी सात फेरे घेत वैवाहिक आयुष्याची नवी सुरुवात केली. विवाहसोहळा तेलुगू आणि कोडवा या दोन्ही पारंपरिक पद्धतींनुसार पार पडला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांच्या संस्कृतींचा सुंदर संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.

3 / 5

लग्नासाठी खास राजेशाही सजावट करण्यात आली होती. पारंपरिक पोशाखात रश्मिका आणि विजय अतिशय देखणे दिसत होते. मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत हा खासगी सोहळा पार पडला. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि इंडस्ट्रीमधील काही मोजकेच मित्रमंडळी यांना आमंत्रित करण्यात आले होते.

4 / 5

रश्मिका आणि विजय या जोडीला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली आहे. पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती आणि आता हीच जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

5 / 5

दरम्यान, उदयपूरमधील विवाहसोहळ्यानंतर 4 मार्च रोजी हैदराबाद येथे भव्य वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाला मनोरंजनसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रिसेप्शनकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us