Rashmika Vijay Sangeet : रश्मिकासोबत विजयचा धमाल डान्स, गुडघ्यावर बसून प्रपोज; संगीतचे फोटो व्हायरल

Rashmika Vijay Sangeet: दक्षिणेतलं लोकप्रिय जोडपं असलेल्या रश्मिका मंदान आणि विजय देवरकोंडाचं गेल्या आठवड्यात शाही सोहळ्यात लग्न झालं. 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये या जोडप्याने दोन वेगवेगळ्या विधींनुसार लग्न केलं. तर काल, 2 मार्च रोजी विजयच्या गावात सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होती. दोघे तिथे पोहोचले आणि त्यांचे असंख्य फोटो व्हायरल होत आहेत. याच दरम्यान आता रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्या संगीतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले, जे पाहता पाहता वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेत.

| Updated on: Mar 03, 2026 | 1:24 PM
1 / 7
Rashmika Vijay Sangeet Function : लोकप्रिय कपल, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात, म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये दोन वेगवेगळ्या रिती-रिवाजांनी, या जोडप्याने लग्न केलं. त्यानंतर, ते त्यांच्या सार्वजनिक रित्या पहिल्यांदा एकत्र दिसले आणि खळबळ उडाली. आता, त्यांच्या लग्नाच्या पाच दिवसांनंतर, रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्या संगीत समारंभाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Rashmika Vijay Sangeet Function : लोकप्रिय कपल, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात, म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये दोन वेगवेगळ्या रिती-रिवाजांनी, या जोडप्याने लग्न केलं. त्यानंतर, ते त्यांच्या सार्वजनिक रित्या पहिल्यांदा एकत्र दिसले आणि खळबळ उडाली. आता, त्यांच्या लग्नाच्या पाच दिवसांनंतर, रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्या संगीत समारंभाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

2 / 7

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या संगीत समारंभात खूप नाच केला, मजा केली. विजय-रश्मिकाने धमाल करत एन्जॉय केलं आणि या खास क्षणाचे फोटो शेअर केले. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या सुंदर क्षणांचा व्हिडिओ देखील शेअर केला.

3 / 7

संगीतचे फोटो शेअर करताना रश्मिका मंदानाने कॅप्शनही लिहीली. "रात्र प्रेमाने, आनंदाश्रूंनी, हास्याने, संगीताने, गाण्यांनी, चमक-धमक असलेली, भरलेली होती आणि आम्ही रात्रभर नाचत होतो. ती खरोखरच आतापर्यंतची सर्वात मजेदार रात्र होती. विज्जू आणि मी एकमेकांना सरप्राईज देणार होतो. कुटुंबही सरप्राईज देणार होतं. आमच्या कुटुंबियांना इतक्या मुक्तपणे आणि आनंदाने नाचताना पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो' असं तिने लिहीलं.

4 / 7

रश्मिका मंदानाने तिच्या संगीतसाठी सिल्व्हर-व्हाइट शरारा आणि ब्लाउज पेहराव केला होता. त्यात वेगवेगळ्या आकारांचे मिरर वर्क होते. तिने डायमंड नेकलेस आणि ट्रिपल-लेयर इयररिंग्ज घातले होते. अभिनेत्रीने साध्या बन हेअरस्टाईलने तिचा लूक पूर्ण केला. तसेच छोटे मिरर वर्क असलेली ओढणीही घेतली. ती खूप सुंदर दिसत होती.

5 / 7

तर, अभिनेता विजय देवरकोंडाने निळ्या रंगाचे, सुंदर भरतकाम केलेले लांब जॅकेट घातले होते. लग्नाप्रमाणेच, संगीतमधील त्याच्या नेकपीसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विजयच्या क्लासी लूकचं खूप कौतुक केलं जातंय.

6 / 7

रश्मिका आणि विजय दोघेही त्यांच्या कुटुंबियांसोबत पोज देताना दिसले. रश्मिका आणि विजयने एकत्र परफॉर्मन्सही दिला. एका फोटोमध्ये ते दोघे गुडघ्यावर बसल्याचंही दिसलं. लोकांनी त्यांच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत अभिनंदनही केलं.

7 / 7

एवढंच नव्हे तर रश्मिका मंदान्ना हिने विजय देवरकोंडाच्या भावासोबत डान्सही केला. एका फोटोमध्ये रश्मिका विजय खूप इमोशनल झालेले दिसले. त्यांचे ब्लॅक अँड व्हाईट फोटोही खूप सुंदर आलेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us