रश्मिका मंदानाच्या सासरचं आलिशान घर; विजय देवरकोंडाने इतक्या कोटींना घेतलं होतं विकत

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. हैदराबादमधील ज्युबिली हिल्स परिसरात विजयचं आलिशान घर आहे. या घरात विजय त्याचे आईवडील आणि भावासोबत राहतो. या घराचे फोटो पहा..

| Updated on: Feb 26, 2026 | 11:37 AM
1 / 9
रश्मिका मंदानाचा पती आणि अभिनेता विजय देवरकोंडा याने 2019 मध्ये 15 कोटी रुपयांना हे घर खरेदी केलं होतं. त्याच्या सोशल मीडियावरील फोटोंमध्ये या घराची झलक पहायला मिळते.

रश्मिका मंदानाचा पती आणि अभिनेता विजय देवरकोंडा याने 2019 मध्ये 15 कोटी रुपयांना हे घर खरेदी केलं होतं. त्याच्या सोशल मीडियावरील फोटोंमध्ये या घराची झलक पहायला मिळते.

2 / 9

विजय देवरकोंडा या घरात त्याचे वडील गोवर्धन राव, आई माधवी आणि भाऊ आनंद यांच्यासोबत राहतो. त्यांच्यासोबत पाळीव श्वान स्टॉर्मसुद्धा या घरात राहतो. विजयच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमध्ये अनेकदा स्टॉर्म दिसतो.

3 / 9

विजयचं हे घर मल्टी-लेव्हल व्हिला आहे. व्हाइट आणि न्यूट्रल टोनचे रंग या घराला देण्यात आले आहेत. त्याच्या घरात काचेच्या मोठमोठ्या खिडक्या आहेत. या घराचं इंटेरिअर अत्यंत साधं पण तितकंच क्लासिक आहे.

4 / 9

मोठ्या लिव्हिंग रुममध्ये मॉडर्न फर्निचर असून या घरात बहुतांश लाकडी फ्लोअरिंग दिसून येते. सॉफ्ट लाइटिंगमुळे हे घर अधिकच आकर्षक दिसतं. विजयने त्याच्या घरात सुंदर आर्ट पीसेससुद्धा लावले आहेत. त्याचसोबत त्याचा वैयक्तिक फोटो फ्रेमसुद्धा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतो.

5 / 9

विजय देवरकोंडाच्या या व्हिलामध्ये आराम करण्यासाठी आणि पार्टीसाठी बरीच मोकळी जागा आहे. यामध्ये इन-हाऊस जिम एरियासुद्धा आहे. त्याचसोबत सुंदर टेरेस गार्डनसुद्धा आहे.

6 / 9

विजयच्या या घरातून हैदराबाद शहराचा सुंदर देखावा पहायला मिळतो, ज्यामुळे हे घर अधिकच खास बनतं. घरात निवांत वेळ घालवण्यासाठी विजयने हा खास कोपरा बनवून घेतला आहे.

7 / 9

विजयने 2011 मध्ये 'नुव्विला' या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'पेल्ली चुपूलू', 'अर्जुन रेड्डी', 'गीता गोविंदम', 'टॅक्सीवाला', 'डिअर कॉम्रेड' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. अर्जुन रेड्डी या चित्रपटाचं नंतर हिंदीत रिमेक झालं असून त्याचं नाव 'कबीर सिंग' असं ठेवण्यात आलं. ज्यामध्ये शाहिद कपूरने मुख्य भूमिका साकारली होती.

8 / 9

'गीता गोविंदम' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रश्मिका आणि विजय यांच्यात चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. 26 फेब्रुवारी रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.

9 / 9

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत विजय देवरकोंडाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याने बॉलिवूडमध्येही काम केलं, परंतु त्याला रश्मिकाएवढं बॉलिवूडमध्ये यश मिळालं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us