Rasika Dugal: बीना भाभीने सांगितला 81 वर्षांच्या बाऊजींसोबत इंटीमेट सीन देण्याचा अनुभव, नेमकं काय म्हणाली?
Rasika Dugal: मिर्झापूरमध्ये बीना भाभीच्या इंटिमेट सीन्सवर सर्वाधिक चर्चा होते. हा रोल रसिका दुग्गलने साकारला आहे. नुकताच रसिकाने या इंटीमेट सीनविषयी खुलासा केला आहे. ती नेमकं काय म्हणाली? वाचा...

‘मिर्झापूर द मूवी’ हा थिएटरमध्ये सध्या धुमाकूळ घालत आहे. लोकांना हा नवा चित्रपट प्रचंड आवडत असल्याचे दिसत आहे. चित्रपटाच्या अनेक सीन्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चाही सुरू आहे. बीना भाभी उर्फ अभिनेत्री रसिका दुग्गल यात एका नवीन अंदाजात दिसली. त्यासोबतच तिचे काही इंटिमेट सीन्सही चांगलेच चर्चेत आहेत.
मिर्झापूरमध्ये आतापर्यंत बीना त्रिपाठीचे पात्र खूप रोचक वाटले आहे. ते रसिका दुग्गलने खूप चांगल्या प्रकारे साकारले. अलीकडेच तिने एएनआयशी बोलताना रोलबाबत मोठा खुलासा केला आहे. रसिका म्हणाल्या की, जसा तिचा रोल आहे, तशी ती वास्तविक जीवनात १ टक्केही नाही. तिने सिनेमात दिलेल्या इंटीमेट सीनबाबत मोठा खुलासा केला आहे.
रसिका म्हणाली की, इंटिमेट सीन्ससाठी आजकाल आपल्याकडे इंटिमसी कोऑर्डिनेटर्स असतात, जे आता खूप आवश्यक गोष्ट आहे. यामुळे हे सुनिश्चित होते की कोणाशीही कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होणार नाही आणि सर्वांची योग्य काळजी घेतली जाते. जसे अॅक्शन सीक्वन्ससाठी फाइट मास्टर असतो, तसेच इंटिमेट सीनसाठी इंटिमसी कोऑर्डिनेटर असतो. आम्ही आधी या सीन्सचे वर्कशॉप करतो आणि समजून घेतो की कोणासाठी काय सहज आहे आणि काय असहज. एका अभिनेत्यासाठी, तुमच्या को-अॅक्टरसाठी आणि स्वतः तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी ठीक आहेत, हे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
‘त्यानंतर आम्ही पाहतो की दिग्दर्शकाला ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही कशा पूर्ण करू शकतो. यासाठी आधी दिग्दर्शक आमच्याशी याबाबत बोलतो. जर कोणाला एखाद्या गोष्टीने अस्वस्थ वाटत असेल, तर आम्ही तोच प्रभाव दाखवण्याचा दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो, पण अशा प्रकारे की कोणालाही अस्वस्थ वाटू नये. आजकाल या सर्व गोष्टी खूप चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेट केल्या जातात आणि मला वाटते की इंटिमसी कोऑर्डिनेटर्स असणे खूप चांगली गोष्ट आहे. यामुळे प्रत्येकजण खूप सहज वाटतो. त्यामुळे हे सर्व खूप व्यावसायिक आणि योग्य पद्धतीने कोऑर्डिनेट केले जाते’ असे रसिका म्हणाली.
रसिका पुढे म्हणाली की, मिर्झापूरच्या पहिल्या सीझनपर्यंत इंटिमसी कोऑर्डिनेटर नव्हते. विदेशात हा ट्रेंड खूप आधीपासून चालू होता, पण भारतात तो नंतर आला. आम्ही भाग्यवान होतो की आमचे युनिट खूप संवेदनशील होते आणि आमचे दिग्दर्शकही खूप संवेदनशील होते. त्या वेळी त्यांनी हे सुनिश्चित केले की इंटिमसी कोऑर्डिनेटरची भूमिका कोण निभावेल. मला आधीच माहीत होते की मी कोणते शॉट्स करत आहे आणि ते कसे चित्रित केले जातील. दिग्दर्शक आधीच माझ्याशी याबाबत बोलले होते, जिकडे मी एखाद्या गोष्टीसाठी अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या गोष्टींची त्या वेळीही खूप चांगली काळजी घेतली गेली होती. पण मी इंटिमसी कोऑर्डिनेटर्सच्या महत्त्वावर जितके जोर देईन, ते कमीच आहे. हे खूप आवश्यक आहे.’