Raveena Tandon : सी-फेसिंग बंगल्यात राहते बॉलिवूडची ‘मस्त-मस्त गर्ल’ रवीना टंडन; पहा आलिशान घराचे Photos

रवीना टंडनने आपल्या अभिनय कारकिर्दीत कॉमेडी, रोमान्स यांसह विविध प्रकारच्या भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांचाही समावेश आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री रवीना टंडनच्या आलिशान घराबद्दल खास गोष्टी.

| Updated on: Oct 26, 2026 | 6:52 PM
1 / 8
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन ही त्यापैकीच एक आहे. अभिनेत्री मुंबईतील आलिशान घरात शाही जीवनशैली जगते.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडन ही त्यापैकीच एक आहे. अभिनेत्री मुंबईतील आलिशान घरात शाही जीवनशैली जगते.

2 / 8

रवीना टंडन मुंबईतील वांद्रे परिसरात समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या (सी-फेसिंग) बंगल्यात राहते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या या घराची किंमत अंदाजे 70 कोटी रुपये आहे. अभिनेत्रीच्या घराचं नाव ‘नीलया’ असं असून, या नावाचा अर्थ ‘निवासस्थान’ किंवा ‘महल’ असा सांगितला जातो. या घरात रवीना तिचा पती अनिल थडानी, मुलं आणि कुटुंबीयांसोबत राहते.

3 / 8

रवीनाच्या घरात प्रवेश करताच चोहीकडे हिरवळ पाहायला मिळते. काळा, लाल आणि राखाडी रंगांच्या दगडांनी घराच्या बाहेरील भागाची सजावट करण्यात आली आहे. घरात एक सुंदर मंदिरही आहे, जिथे कुटुंबातील सदस्य पूजा करतात. हे मंदिर रवीनाच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. घराच्या बांधकामादरम्यान वास्तुशास्त्राचीही विशेष काळजी घेण्यात आल्याचं सांगितलं जातं.

4 / 8

घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश पोहोचू शकेल अशा पद्धतीने मंदिराची रचना करण्यात आली आहे. घराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली भगवान गणेशाची कलात्मक मूर्ती आणि सजावट लक्ष वेधून घेते.

5 / 8

रवीनाच्या घरात एक खास बारदेखील आहे. या बारमध्ये महागडी पेये, आकर्षक ग्लास, फ्लास्क आणि विविध शोभेच्या वस्तू पाहायला मिळतात.

6 / 8

‘फिल्मफेअर’च्या वृत्तानुसार, रवीनाच्या घराची वास्तुरचना मोरोक्कन, युरोपियन, फ्रेंच आणि दक्षिण भारतीय शैलींपासून प्रेरित आहे. यामध्ये प्रामुख्याने केरळच्या वास्तुशैलीची झलक पाहायला मिळते. घराच्या अंगणातील आरामदायी बैठक व्यवस्था या अनोख्या सजावटीचं उत्तम उदाहरण आहे.

7 / 8

26 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबईत रवीना टंडनचा जन्म झाला. दिवंगत चित्रपट निर्माते रवी टंडन आणि वीणा टंडन यांच्या घरी तिचा जन्म झाला. रवीनाने अगदी दहावीत असतानाच काम करण्यास सुरुवात केली होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये यशस्वी कारकीर्द घडवली.

8 / 8

रवीनाच्या आलिशान घरात व्यायामासाठी स्वतंत्र जिमदेखील आहे. या खोलीच्या भिंती काचेच्या बनवण्यात आल्या आहेत, त्यामुळे बाहेरील नैसर्गिक प्रकाश खोलीत सहजपणे येतो. आलिशान सजावट, हिरवळ आणि समुद्राचं सुंदर दृश्य यांमुळे रवीनाचं घर एखाद्या महालापेक्षा कमी नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us