Rinku Rajguru: ए… मराठीत सांगितलेलं कळत नाही का?; दहीहंडी कार्यक्रमात रिंकू राजगुरू असं का म्हणाली?

Rinku Rajguru: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक रिंकू राजगुरू चांगलीच चर्चेत आहे. तिने नुकताच एका दहीहंडी कार्यक्रमात एक डायलॉग मारला. त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

| Updated on: Sep 06, 2026 | 11:07 AM
1 / 5
काल सगळीकडे दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये अनेक कलाकार देखील सहाभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

काल सगळीकडे दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये अनेक कलाकार देखील सहाभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

2 / 5

मुंबईतील एका दहीहंडी उत्सवात सर्वांची आवडती आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू देखील सहभागी झाली होती. तिने या सोहळ्यात एक डायलॉग मारला. हा डायलॉग पाहून अनेकांना वाटले की रिंकू चिडली की काय. पण खरं तर चाहत्यांसाठी रिंकूने हा डायलॉग मारला.

3 / 5

रिंकूने मुंबईतील एका दहीहंडी उत्सवात काळ्या रंगाचा ड्रेस घालून हजेरी लावली. त्यावर तिने केस मोकळे सोडले होते, गळ्यात सुंदर असे गळ्यातले, हातात कडा घातलेला आहे.

4 / 5

रिंकूने नवी मुंबईतील ऐरोली येथील कार्यक्रमात हजेरी लावताच चाहते उत्साही पाहायला मिळाली. तिने सर्वांसमोर 'ए... मराठीत सांगितलेलं कळत नाही का?' असे म्हटले.

5 / 5

रिंकूचा सैराट हा सिनेमा तुफान गाजला होता. या सिनेमातील तिचा 'ए... मराठीत सांगितलेलं कळत नाही का, इंग्रजीत सांगू का?' हा डायलॉग हिट ठरला होता. त्यामुळे तिने दहीहंडी उत्सवात हा डायलॉग मारला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us