Marathi News » Photo gallery » Romantic photos of IAS Tina Dabi and Pradip Gawande go viral on social media
PHOTO | आयएएस टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
टीना डाबीने याआधी 2018 मध्ये आयएएस अतहर खानशी लग्न केल्याची माहिती आहे. दोन वर्षांनंतर, 2020 मध्ये, ते परस्पर संमतीने वेगळे झाले. टीना आता पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीत आहे. तिचे दुसरे लग्न राजस्थानमध्ये तैनात असलेले आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्याशी होणार आहे.
सध्या आयएएस टीना डाबीच्या दुसऱ्या लग्नाची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर टीना आणि प्रदीप यांच्यावर पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शुभेच्छांबद्दल त्यांनी एक पोस्ट टाकून जनतेचे आभार मानले आहेत.
1 / 5
टीना डाबी राजस्थान पुरातत्व विभागाचे संचालक प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न करणार आहे. टीना डाबीचा पहिला पती अतहर आमिर खान आणि टीनाची बहीण रिया डाबीही आयएएस आहे.
2 / 5
इंस्टाग्रामवर प्रदीप गावंडेसोबतचे फोटो शेअर करत टीनाने लिहिले, सोशल मीडियावर मिळालेल्या कॉल, मेसेज आणि शुभेच्छांसाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छिते. गेल्या 24 तासात आम्हाला मिळालेले प्रेम आणि जिव्हाळा प्रचंड आहे, विशेषतः महाराष्ट्रातून. खरोखर कृतज्ञ. प्रदीप गावंडे हे महाराष्ट्रातील आहेत.
3 / 5
प्रदीप गावंडे यांनी टीना डाबीसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तो आणि टीना कुटुंबासोबत दिसत आहेत. प्रदीप गावंडेंनी लिहिले की, 'कौटुंबिक कार्यक्रमातील काही क्षण शेअर करत आहे.' त्याच्या या फोटोवर यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
4 / 5