छोटे कपडे परिधान केल्यावर डबल पैसे मिळायचे, बॉलिवूडमधील बॅकग्राऊंड डान्सरचा मोठा खुलासा, थेट….

बॉलिवूडमधील बॅकग्राऊंड डान्सरने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामध्ये तिने सांगितलं की, छोट-छोटे कपडे परिधान केल्यावर डबल पैसे मिळायचे.

| Updated on: May 21, 2026 | 1:50 PM
1 / 5
बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेमागे अनेक संघर्ष, अनुभव आणि न ऐकलेल्या गोष्टी दडलेल्या आहेत. विशेषतः पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांचे अनुभव अनेकदा धक्कादायक असतात. अशाच काही आठवणी आणि अनुभव आता प्रसिद्ध बॅकग्राऊंड डान्सर रुबीना खानने शेअर केला आहे.

2 / 5
90 च्या दशकात अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलेल्या रुबीना खानने त्या काळातील स्टार्सच्या वागणुकीबाबत काही आश्चर्यचकित करणारे खुलासे केले आहेत. काही कलाकार अतिशय साधे आणि मैत्रीपूर्ण होते तर काही अभिनेत्री डान्सर्सपासून अंतर ठेवून वागत असत असं तिने सांगितलं.

3 / 5
ती म्हणाली की, एवढी मोठी सुपरस्टार असूनही माधुरी दीक्षित अत्यंत नम्र आणि साध्या स्वभावाच्या होती. तिने एक प्रसंग सांगताना म्हटलं की, एका शूटिंगदरम्यान माधुरी खुर्ची सोडून थेट बॅकग्राऊंड डान्सर्ससोबत जमिनीवर बसल्या होत्या. तिने सर्वांसोबत हसत-खेळत गप्पा मारल्या आणि कोणताही मोठेपणा दाखवला नाही.

4 / 5
रुबीना खानने त्या काळातील बॅकग्राऊंड डान्सर्सच्या मानधनाबाबतही धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितलं की त्या काळात डान्सर्सना मिळणारे पैसे अनेकदा त्यांच्या कॉस्च्युमवर अवलंबून असायचे. जर एखाद्या गाण्यात छोटे किंवा ग्लॅमरस कपडे घालावे लागत असतील तर त्यासाठी स्पेशल रेट दिले जायचे. अनेकदा फी थेट दुप्पट होत असे.

5 / 5
याशिवाय कट्स असलेले कॉस्च्युम, विग, टॅटू किंवा जास्त मेकअप असलेल्या लूकसाठी वेगळे पैसे मिळत असत. कारण डान्सर्सची बेसिक सॅलरी खूपच कमी होती. धक्कादायक बाब म्हणजे, आजही अनेक प्रोडक्शन हाऊसेस बॅकग्राऊंड डान्सर्सना जवळपास तितकीच रक्कम देतात.

Follow Us