रशियाची थेट युद्धात उडी? इराणला मदत केल्याने जग चकित, गुप्त माहिती समोर येताच अमेरिकेची झोप उडाली!

अमेरिका आणि इराण यांच्यात आता नव्याने संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही देशांचे शीर्षस्थ नेते एकमेकांना धमक्या देत आहेत. दरम्यान, आता एकीकडे दोन्ही देशांमध्ये संघर्ष चालू असताना आता रशियाने मोठा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Jul 13, 2026 | 7:18 PM
1 / 5

2 / 5

मिळालेल्या माहितीनुसार रशियाने अत्याधुनिक आणि सोईसुविधांनी युक्त असलेले Tu-214PU नावाचे विमान थेट इराणला पाठवून दिले आहे. हा निर्णय म्हणजे रशिया अप्रत्यक्षपणे या युद्धात उतरल्याचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे. हे एक सुरक्षित कमांड एअरक्राफ्ट आहे.

3 / 5

रशियाने इराणला पाठवलेले हे विमान Tu-214 या विमानाचे संशोधित रुप आहे. Tu-214PU हे विमान मोबाईल कमांड पोस्ट आहे. त्यात अत्याधुनिक संदेशवहन प्रणाली आहे. तसेच एन्क्रिप्टेड लिंक, सॅटेलाईट कम्यूनिकेशन, अणुयुद्धाच्या काळात काम करणारी रिडंडेंट सिस्टिम आहे.

4 / 5

इलेक्ट्रॉनिक जामिंग, खराब हवामान अशा कोणत्याही आपत्कालीन स्थितीत उड्डाण करू शकेल, अशी त्याची रचना केलेली आहे. दरम्यान, रशियाच्या निर्णयाने इराणला बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

5 / 5

आपत्कालीन स्थितीत रशियातील सर्वोच्च राजकीय नेते तसेच अन्य सैन्य अधिकाऱ्यांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी या विमानाचा उपयोग केला जातो. आता रशियाने इराणची मदत केल्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us