VN |
Mar 31, 2021 | 11:07 AM
सध्या झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
त्यात सई आणि आदित्यची जोडी प्रेक्षकांची आवडती झालीये. त्यांची भांडणं, प्रेम, दुरावा, लग्न हे सगळं प्रेक्षकांनी अनुभवलंय आणि आवडीने पाहिलंय.
आता नुकतंच सई आणि आदित्यचं लग्न पार पडलंय. त्यामुळे आता दोघं हनिमूनला पोहोचले आहेत.
याच हनिमूनचे काही फोटो विराजसने म्हणजेच आदित्यने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दोघंही मनालीमध्ये धमाल करताना दिसत आहेत.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682