कधीकाळी सलमान खानची आवडती हिरोईन, लग्न होताच झाली गायब, आता जगतेय असं आयुष्य!

या अभिनेत्रीने सलमान खासोबत काम केलेले आहे. परंतु लग्न झाल्यावर ती लाईमलाईटपासून दूर झाली. आता ती सिनेक्षेत्रात सक्रीय नाही. परंतु तरीदेखील ती चर्चेत असते.

| Updated on: Feb 25, 2026 | 12:02 AM
1 / 5
सुपरस्टार सलमान खानसोबत जिनं काम केलं त्याच भाग्यश्री या अभिनेत्रीचा नुकताच वाढदिवस झाला. ही अभिनेत्री सिनेसृष्टीत आली तेव्हा ती फारच कमी वेळात प्रसिद्ध झाली. तिचा मैना प्यार किया हा चित्रपट आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला.

सुपरस्टार सलमान खानसोबत जिनं काम केलं त्याच भाग्यश्री या अभिनेत्रीचा नुकताच वाढदिवस झाला. ही अभिनेत्री सिनेसृष्टीत आली तेव्हा ती फारच कमी वेळात प्रसिद्ध झाली. तिचा मैना प्यार किया हा चित्रपट आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला.

2 / 5

या चित्रपटानंतर सगळीकडे तिचीच चर्चा चालू झाली. बॉलिवुडमध्ये ती मोठं नाव कमवेल असं सगळेच मानू लागले. पण नंतर लगेच तिने तिचा प्रियकर हिमालय दासानी यांच्यासोबत लग्न केलं. ते दोघेही एकाच शाळेत शिकलेले आहेत. शाळेत असताना या दोघांचे खूप भांडण व्हायचे.

3 / 5

त्यांची लव्हस्टोरी खूपच मजेदार आहे. हिमालय यांना भाग्यश्रीला प्रेमाबद्दल सांगायचं होतं. परंतु हिमालय हे सांगायला घाबरत होते. त्यानंतर एका दिवशी मीच त्याच्याकडे गेले आणि तुला काय विचारायचं ते विचार तुला सकारात्मक उत्तर मिळेल, असं मीच त्याला सांगितलं, असं भाग्यश्रीने एका मुलाखतीत सांगितलेले आहे.

4 / 5

हिमालय यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर मला मुलगा झाला. मला माझा परिवार महत्त्वाचा होता. त्यामुळे या काळात मला चित्रपटाच्या अनेक ऑफर्स आल्या परंतु मी त्या नाकाराल्या, असेही भाग्यश्रीने सांगितलेले आहे.

5 / 5

सध्या भाग्यश्री पूर्णपणे लाईमलाईटपासून दूर आहे. आपल्या कुटुंबासोबत ती वेळ घालवते. मी माझ्या कुंटबाला वेळ देते याचा मला अभिमान आहे, असेही भाग्यश्रीने सांगितलेले आहे. आता भाग्यश्री लाईमलाईटपासून खूप दूर आहे. तरीदेखील ती नेहमीच चर्चेत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us