Salman Khan : हा माझ्या पाया पडला नाही.., भर कार्यक्रमात शाहिद कपूरबद्दल असं का म्हणाला सलमान? बिष्णोई गँगचं कारण?
IIFA इव्हेंटदरम्यान सलमान खान आणि शाहिद कपूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. शाहिद स्टेजकडे जात असताना त्याच्या हावभावांकडे सलमानचं लक्ष गेलं. नेमकं काय घडलं आणि सोशल मीडियावर कोणत्या चर्चा सुरू आहेत, जाणून घेण्यासाठी पुढील माहिती नक्की वाचा.

आबू धाबी मध्ये होणाऱ्या IIFA इव्हेंटच्या आधी मुंबईत ह्या इव्हेंटची प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. हा इव्हेंट २२ आक्टोबर गुरुवारी मुंबईमध्ये झाला.
IIFA च्या इव्हेंटमध्ये सलमान खान, वरुण धवन, करीना कपूर खान, शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना यांसारख्या तमाम स्टार सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
इव्हेंटमध्ये सलमान खान याने आपल्या डान्स मूव्स आणि दबंग अंदाजामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ह्या IIFA इव्हेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हरायल होत आहे
विडिओमध्ये शाहिद स्टेजकडे जाताना पायऱ्यांवर आपली मान झुकवताना दिसला. शाहिदच्या ह्या हावभावांनी सलमानचे लक्ष वेधून घेतले.
त्यांनतर सलमानने माईक घेतला आणि म्हणाला ह्याने (शाहिद) माझे पाय नाही धरले. (आशीर्वाद). जसा हा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तसं ह्यावर फॅनच्या कॉमेन्टचा पाऊस पडला. एका फॅन तर लिहिलं कि भीतीचं वातावरण आहे. दुसऱ्याने लिहिलं कि बिष्णोई गँग शाहिदला सलमानच्या जवळचा समजून गोळी मारू नये.
तर काहींनी सांगितले की, सलमान भाईने स्पष्ट केले आहे की स्टेजच्या पायांना शाहिदने स्पर्श केला आहे माझ्या नव्हे. काहींनी म्हटलं की, सलमान भाई आपल्या जवळच्या लोकांना संरक्षण देत आहे... बिश्नोई गँगमुळे सलमानने शाहिदसाठी असं वक्तव्य दिल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. कारण नुकताच टायगर श्रॉफवर गोळीबार झाला, त्याची जबाबदारी कोणाची..
सलमानसोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते ठार मारतील, असेही बिश्नोई गँगने म्हटले आहे. कदाचित त्यामुळेच सलमानला शाहिदपासून दूर राहणेच योग्य वाटले.