तो सायकलवरून आला अन् दाणकन नको तिथे हात मारला… बॉलिवूड अभिनेत्रीला आलेला हादरवणारा अनुभव

अभिनेत्री समीरा रेड्डीने नुकत्याच एका मुलाखतीत बालपणीचा धक्कादायक प्रसंग सांगितला. सायकलवरून आलेल्या मुलाने नको तिथे हात मराल्याने ती भडकली आणि...

| Updated on: Jul 17, 2026 | 9:57 AM
1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती आपल्या आयुष्यातील चांगले-वाईट अनुभव चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. नुकत्याच एका मुलाखतीत तिने बालपणीचा एक धक्कादायक प्रसंग सांगितला. ( All Photos : Social Media)

2 / 7
समीराने सांगितलं की, एक दिवस ती शाळेत जात असताना समोरून 14-15 वर्षांचा मुलगा  सायकलवरून आला. काही कळायच्या आत, त्याने समीराच्या छातीवर जोरात हात मारला आणि हसत तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

3 / 7
त्या घटनेनंतर समीरा प्रचंड संतापली, तिचा राग अनावर झाला. तिने शाळेची बॅग आणि पाण्याची बाटली तिथेच टाकत, त्या मुलाच्या मागे धाव घेतली. बराच पाठलाग करून तिने त्याला पकडलं आणि खाली पाडून चोप दिला. आणि चांगलाच धडा शिकवला.

4 / 7
समीरा म्हणाली की लहानपणी मी थोडी स्थूल होते. माझ्या बहिणी टॉप मॉडेल असल्यामुळे स्वतःच्या शरीराविषयी मला अनेकदा न्यूनगंड वाटायचा.

5 / 7
एक काळ असा होता की मला स्वतःचं शरीरही आवडत नव्हतं. मात्र, वयाच्या ३०-३५ वर्षांनंतर मी स्वतःला स्वीकारायला सुरुवात केली आणि त्या असुरक्षिततेतून बाहेर पडल्याचं समीराने नमूद केलं.

6 / 7
समीराचं मत आहे की मुलांना लहानपणापासूनच लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे. विशेषतः मुलांना महिलांशी आदराने आणि योग्य पद्धतीने कसं वागायचं, हे पालकांनी शिकवणं गरजेचं आहे, असं ती म्हणाली.

7 / 7
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर समीरा रेड्डी ही शेवटची, आखिरी सवाल या चित्रपटात पल्लवी मेननच्या भूमिकेत दिसली होती. हिंदीसोबतच तिने अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Follow Us