मला त्यांनी नग्न करुन टाकलं…बॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा, थेट इंडस्ट्रीच सोडली अन् आता…

Sana Khan On Her Past: बॉलिवूड अभिनेत्री सना खानने तिच्या भुतकाळाबद्दल एक गोष्ट उघड केली आहे. ज्यात तिला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला होता हे बोलून दाखवलं आहे.

| Updated on: Oct 29, 2026 | 10:11 AM
1 / 5
बॉलिवूड चित्रपटांमधील आपल्या ग्लॅमरस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री सना खान हिने मुफ्ती अनस सईद यांच्याशी विवाह करून मनोरंजन विश्वाला रामराम ठोकला असून, आता ती इस्लाम धर्माचा मार्ग स्वीकारत आहे.

बॉलिवूड चित्रपटांमधील आपल्या ग्लॅमरस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री सना खान हिने मुफ्ती अनस सईद यांच्याशी विवाह करून मनोरंजन विश्वाला रामराम ठोकला असून, आता ती इस्लाम धर्माचा मार्ग स्वीकारत आहे.

2 / 5

काही काळापूर्वी, रुबिना दिलैकशी झालेल्या संभाषणात, तिने एका अशा काळाबद्दल सांगितले होते, जेव्हा आपल्यासोबत काय घडत आहे हे तिला समजत नव्हते. सैतानाची सावली आपल्यावर घिरट्या घालत आहे, असा तिचा विश्वास बसू लागला होता.

3 / 5

आपल्या पूर्वीच्या ग्लॅमरस आयुष्याबद्दल खंत व्यक्त करताना सना म्हणाली की, तिच्या आयुष्यात सर्व काही होते, पण ती आनंदी नव्हती. ती काही कपडे किंवा गाडी विकत घ्यायची आणि तिला काही काळासाठी आनंद व्हायचा, पण नंतर सगळं पुन्हा पूर्वीसारखं व्हायचं. तिने खूप पैसे कमावले आणि खर्च केले, पण ती आनंदी राहू शकली नाही.

4 / 5

सनाने तिच्यातील बदलाची आठवणही सांगितली. ती म्हणाली, "मी, एक साधी मुलगी, जी सलवार-कमीज घालून आणि तेल लावून कॉलेजला जायची, ती शॉर्टकट आणि बॅकलेस ड्रेसच्या या टप्प्यावर कशी पोहोचली, हे मला कळतच नव्हतं. सैतानाने मला कधी नग्न केलं हे माझ्या लक्षातही आलं नाही."

5 / 5

हे सांगताना सना रडू लागली. तिने स्पष्ट केले की, जेव्हा तिच्या लक्षात आले की ती ज्या मार्गावर आहे तो तिच्या मुस्लिम श्रद्धेच्या विरोधात आहे, तेव्हा तिने ग्लॅमर इंडस्ट्री सोडली. तिला स्वतःच्या बदलाचे आश्चर्य वाटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us