AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऊसदरासाठी पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन पेटले, सातारा आणि सांगलीत ‘स्वाभिमानी’चे रणकंदन, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Protests over sugarcane prices: ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा जिल्ह्यात शेतकरी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काय आहे मोठी अपडेट?

ऊसदरासाठी पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन पेटले, सातारा आणि सांगलीत 'स्वाभिमानी'चे रणकंदन, वाहनांच्या लांबच लांब रांगा
ऊसदरासाठी पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन पेटले, सातारा आणि सांगलीत 'स्वाभिमानी'चे रणकंदन, वाहनांच्या लांबच लांब रांगा
| Updated on: Oct 29, 2026 | 10:00 AM
Share

Swabhimani Shetkari Saghatana Protests in Western Maharashtra: ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊसाचा दर वाढवण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून स्वाभिमानीचा सरकार आणि कारखानदाराशी झगडा सुरू आहे. पण तोडगा न निघाल्याने शेतकरी आणि कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पहिली ठिणगी पडली आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहनं आडवल्याने लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून चोराडे फाट्यावर १०० ऊस वाहने रोखली

​यंदाच्या ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खटाव तालुक्यात आपले आंदोलन तीव्र केले आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार आणि तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे यांच्या नेतृत्वाखाली मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गावरील चोराडे फाट्यावर विविध कारखान्यांची सुमारे १०० ऊस वाहतूक वाहने रोखून धरण्यात आली आहेत. “यंदाचा ऊसदर जाहीर झाल्याशिवाय एकही वाहन पुढे जाऊ देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेत संघटनेने कारखानदारांना ठाम इशारा दिला आहे. लवकरात लवकर ऊस दर जाहीर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेश कार्याध्यक्ष यांनी याप्रकरणी अनिल पवार यांनी सरकारला इशारा दिला आहे.

ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सांगली जिल्ह्यातील आंदोलन आक्रमक झाले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेली ऊस वाहतूक स्वाभिमानीकडून रोखण्यात येत आहे.कराडच्या कृष्णा कारखान्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक ईश्वरपूर नजकीच्या बहे येथे रोखण्यात आली होती. स्वाभिमानीची माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस वाहतूक रोखण्यासाठी छावणी आंदोलन करत सुमारे 70 ते 80 उसाचे ट्रॅक्टर ट्रॉल्या रोखण्यात आले होत्या,तर दुसऱ्या बाजूला सांगली मधील ईश्वरपूर बायपास रोडवर इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याच्या ट्रॅक्टर ट्रॉली देखील रोखण्यात आल्या होत्या 25 ते 30 उसाने भरलेली वाहन स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रोखली होती, ऊसाला चार हजार पाचशे रुपये दर मिळालाच पाहिजे त्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटक मनोहस पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.

Follow Us
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
Congress : महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…