Jasprit Bumrah-Sanju Samson : संजू सॅमसनची जसप्रीत बुमराहवर मात, मिळाला हा मानाचा पुरस्कार, कारण काय

Jasprit Bumrah-Sanju Samson : जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन हे दोघे टीम इंडियाचे स्टार आहेत. पण एका मानाच्या पुरस्काराच्या शर्यतीत संजू सॅमसनने जसप्रीत बुमराहवर मात केली.

| Updated on: Apr 14, 2026 | 4:17 PM
1 / 5
भारताला टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये चॅम्पियन बनवणाऱ्या संजू सॅमसनला आयसीसीने एक खास पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. आयसीसीने मार्च महिन्यासाठी संजू सॅमसनची बेस्ट आयसीसी प्लेयर म्हणून निवड केली आहे. खास बाब म्हणजे संजू सॅमसनने जसप्रीत बुमराहवर मात केलीय.

2 / 5
संजू सॅमसनने टी20 वर्ल्ड कपच्या पाच सामन्यात 80.2 च्या सरासरीने 321 धावा केल्या. संजूने टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये अर्धशतक फटकावून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्यामुळे तो जसप्रीत बुमराहवर भारी पडला.

3 / 5
जसप्रीत बुमराहने टी20 वर्ल्ड कपमध्ये कमालीची गोलंदाजी केली. त्याने 8 सामन्यात 14 विकेट घेतलेत. तो टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्लेयर ऑफ द मॅच ठरला. त्याचा इकॉनमी रेट सुद्धा 6.21 रन्स प्रति ओव्हर होता.

4 / 5
संजू सॅमसनने आयसीसीचा प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड मिळवल्यानंतर ही सन्मानाची बाब असल्याचं म्हटलं. टी20 वर्ल्ड कप जिंकणं हा आपल्यासाठी किंमती क्षण असल्याचं तो म्हणाला. कोच आणि सिलेक्टर्सनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे असं सॅमसन म्हणाला.

5 / 5
 महिला क्रिकेटर्समध्ये न्यूझीलंडची कर्णधार एमिली करला  प्लेयर ऑफ द मंथचा अवॉर्ड मिळाला. करला तिसऱ्यांदा हा मान मिळाला. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे विरुद्ध एमिली करने बॅट आणि बॉलने जबरदस्त प्रदर्शन केलं. झिम्बाब्वे विरुद्ध तीन मॅचमध्ये तिने 16 विकेट काढल्या.

Follow Us