
पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक याने तिसरा विवाह केला आहे. मलिकने सना जावेद या अभिनेत्रीसोबत निकाह केला आहे. दोघेही चांगलेच चर्चेत असलेले पाहायला मिळतात. अशातच ही नवीन जोडी परत एकदा चर्चेत आली आहे.

पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या PSL मध्ये सना जावेद ही प्रत्येक सामन्यामध्ये उपस्थित असलेली पाहायला मिळते. अशाच प्रकारे एका सामन्यामध्ये ती आली असताना पाकिस्तानचा खेळाडू सर्फराज अहमद याने आपल्या नव्या वहिनीसोबत सेल्फी काढला.

PSL मध्ये शोएब मलिक हा कराची किंग्ज या संघाकडून तो खेळतो. प्रत्येक सामन्यामध्ये त्याची नवीन पत्नी सना जावेद सामन्यात दिसते.

क्वेटा ग्लैडिएटर्स आणि कराची किंग्स या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यानंतर सर्फराज अहमद, शोएब अख्तर आणि सना जावेद यांनी सेल्फी घेतला. हा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळाला आहे.

सर्फराज अहमद याच्या क्वेटा ग्लैडिएटर्स संघाने कराची किंग्स संघाचा पराभव केला. ५ विकेटने या सामन्यात कराची किंग्स संघाचा पराभव झाला.