पालखीतून शाळेत जाणारी मुलगी थेट चाळीत आली! मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितली भन्नाट Love Story

ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याचा उलगडा केला. त्यांनी त्यांची सुंदर प्रेमकहाणी सांगितली. गडगंज श्रीमंतीत वाढलेली त्यांची पत्नी प्रेमापोटी सर्व काही सोडून आलेली त्यावेळी नेमकं काय घडलं याबबत त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.

| Updated on: Nov 03, 2026 | 8:33 PM
1 / 5
सतीश पुळेकर यांनी प्रेमविवाह केला असून त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा 1 वर्षाने ज्युनियर होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र, ही गोष्ट समजल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला गुजरातमधील बडोदा येथे 3 वर्षे ठेवले.

सतीश पुळेकर यांनी प्रेमविवाह केला असून त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा 1 वर्षाने ज्युनियर होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र, ही गोष्ट समजल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला गुजरातमधील बडोदा येथे 3 वर्षे ठेवले.

2 / 5

त्यावेळी मोबाईल नसल्यामुळे दोघांनाही एकमेकांशी संपर्क साधता येत नव्हता. दरम्यान, पुळेकर यांनी कला शिक्षण पूर्ण करून नोकरी करण्यास सुरुवात केली. 1974 मध्ये त्यांच्या पत्नीचा अचानक फोन आला.

3 / 5

त्यांच्या लग्नाला आता 52 वर्षे पूर्ण झाली आहेत. आंतरजातीय विवाह असल्यामुळे पत्नीच्या कुटुंबीयांशी त्यांचे संबंध जुळले नाहीत. लग्नाच्या वेळी मित्रांनी मात्र त्यांना साथ दिली. जर तिच्या घरचे मारायला वगैरे आले तर त्यांचे मित्र घराखाली सेटींग करून उभे होते.

4 / 5

त्यांच्या लग्नाला आता 52 वर्षे पूर्ण झाली आहेत. आंतरजातीय विवाह असल्यामुळे पत्नीच्या कुटुंबीयांशी त्यांचे संबंध जुळले नाहीत. लग्नाच्या वेळी मित्रांनी मात्र त्यांना साथ दिली.

5 / 5

पत्नी अत्यंत श्रीमंत कुटुंबात वाढली होती. लहानपणी ती पालखीतून शाळेत जायची, पुळेकरांनी एक किस्सा सांगितला, त्यांची पत्नी लहानपणी कधी कोणच्या घरी वगैरे जात असे तेव्हा एक चाकर फक्त तिच्या चपला काढणे, बाजूला ठेवणे यासाठी जायचा. मात्र प्रेमासाठी तिने चाळीतील साधे आयुष्य स्वीकारले. आर्थिक अडचणींच्या काळात तिने 2 वर्षे त्यांना सावरले, असे सांगताना पुळेकर यांनी तिच्या पत्नीचे विशेष कौतुक केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us