डर नहीं दहशत.. 2026 मधला सर्वांत मोठा चित्रपट, प्रदर्शनापूर्वीच तगडी कमाई; ‘धुरंधर 2’लाही टाकणार मागे?

तब्बल 400 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच 250 कोटी रुपयांची कमाई केली आहे. येत्या ख्रिसमसला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दमदार कलाकारांची मोठी फौज पहायला मिळणार आहे.

| Updated on: Apr 21, 2026 | 12:27 PM
1 / 5
बॉलिवूडचा 'बादशाह' अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या आगामी 'किंग' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तब्बल 400 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनणाऱ्या या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान तीन वर्षांनंतर कमबॅक करत आहे. हा चित्रपट 2026 या वर्षातील ख्रिसमसला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2 / 5
'किंग'बद्दल प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ आहे की पाच महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टायटल रिव्हिल व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट करण्यात आला होता. त्या व्हिडीओ तब्बल 44 मिलियन आणि दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शनाची तारीख जाहीर करणाऱ्या टीझर व्हिडीओला 30 मिलियन (दशलक्ष) व्ह्यूज मिळाले आहेत. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच तब्बल 250 कोटी रुपये कमावले आहेत. 'बॉलिवूड हंगामा'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'किंग'चे थिएट्रिकल डिस्ट्रीब्युशन राइट्स म्हणजेच थिएटरमध्ये दाखवल्या जाण्याचे हक्क 250 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. शाहरुखसाठी हा चित्रपट खूपच खास आहे, कारण यामध्ये त्याची मुलगी सुहानासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

4 / 5
ताज्या माहितीनुसार, पेन मरुधरने 'किंग'चे संपूर्ण भारतातील थिएट्रिकल डिस्ट्रीबुशन राइट्स विकत घेतले आहेत. त्यासाठी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटसोबत 250 कोटी रुपयांची मोठी डील झाली आहे. या वर्षातील हा सर्वांत मोठ्या करारांपैकी एक आहे.

5 / 5
'किंग' हा चित्रपट 24 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, सुहाना खान, अभय वर्मा आणि अर्शद वारसी यांच्या भूमिका आहेत. सिद्धार्थ आनंद याचं दिग्दर्शन करणार आहे.

Follow Us