शाका लाका बूम बूममधील ही अभिनेत्री आता काय करते, 300 वेळा दिलं ऑडिशन, तरीही मिळाला नकार, आता…

शाका लाका बूम बूम मधील ऋतु 26 वर्षानंतर आता कशी दिसते. ओळखणंही झालं मुश्किल. 300 वेळा ऑडिशन देऊन देखील ठरली अपयशी. आता करतेय हे काम?

| Updated on: Apr 21, 2026 | 12:58 PM
1 / 5
90 च्या दशकात मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा शाका लाका बूम बूम हा लोकप्रिय शो आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजा आहे. या मालिकेचं नाव घेतलं की छोटा संजू आणि करुणा ही पात्रं डोळ्यांसमोर उभी राहतात.

90 च्या दशकात मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा शाका लाका बूम बूम हा लोकप्रिय शो आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजा आहे. या मालिकेचं नाव घेतलं की छोटा संजू आणि करुणा ही पात्रं डोळ्यांसमोर उभी राहतात.

2 / 5

ही भूमिका अनुक्रमे किंशुक वैद्य आणि हंसिका मोटवानी यांनी साकारली होती. मात्र या जादुई दुनियेत आणखी एक ठसठशीत आणि वेगळं पात्र होतं रितू. ही धाडसी, टॉमबॉय स्वभावाची मुलगी म्हणजे पात्र सायनी राज.

3 / 5

सायनी राज आज अभिनयापासून दूर असली तरी ती पूर्णपणे मनोरंजन क्षेत्राशी जोडलेली आहे. ती एक कवयित्री, लेखिका, गीतकार आणि वर्च्युअल बुक क्लबची संस्थापक आहे. विशेष म्हणजे, तिने सब सही हो जाएगा या गाण्याचे बोल लिहिले आहेत, जे कोविड-19 लॉकडाउनदरम्यान शाहरुख खानने गायले आहे.

4 / 5

याशिवाय तिने रॅपर बादशाहसोबतही काम केलं आहे. तसेच Int. Cafe Night या शॉर्ट फिल्मची कथा तिने लिहिली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन अधिराज बोस यांनी केलं होतं, तर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाहने त्यात प्रमुख भूमिका साकारली होती.

5 / 5

सायनीने वयाच्या केवळ 7व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली होती. तिला पहिल्या कामासाठी फक्त 300 रुपये मिळाले होते. मात्र तिच्यात काम करण्याची जिद्द सुरुवातीपासूनच होती. आज सायनी राज एक सक्रिय लेखिका आणि कवयित्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us