Sharad Pawar on Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडाधड कारवाई… अखेर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर; काय म्हणाले पवार?

Sharad Pawar on Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बेधडक कारवायांची राज्यात चर्चा सुरु आहे. आता यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Sep 03, 2026 | 11:34 AM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील FDA चर्चेत आहे. अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FDA ची सूत्रे हातात घेतल्यावर संपूर्ण राज्यभर कारवाया सुरू केल्या आहेत. अनेक भेसळ खोरांविरोधात त्यांनी बेधडक कारवाई केली आहे. त्यांच्या कारवाईचे संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे. आता यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5

तुकाराम मुंढेंनी कारवाई सुरु केल्यानंतर दूधाचे दर वाढले आहेत. जे दूध 60 रुपयांना मिळायचं त्याचा दर आता 80 रुपये झालाय. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 5

शरद पवार यांनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, दूधातली भेसळ थांबलीय. त्यामुळे उत्पादकता वाढली आहे. चांगलं दूध मिळत असल्याने ग्राहकही दोन पैसे देतायत. हे चांगलं आहे.

4 / 5

जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन चाललय. त्यावर सांगितलं की, 'बघुया आता काय होतय, सकाळी काही मंत्री तिथे जाणार आहेत'

5 / 5

काल मुंबईत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार हॉटेल व खाद्य आस्थापनांवर FDAने कारवाई केली आहे. गोरेगाव येथील ईटक्लब ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कुर्ला येथील राणी क्रिएटर्स कन्सल्टंट अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांचे अन्न परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us