तो अचानक व्हॅनिटी व्हॅनमध्ये घुसरा, अश्लील कृत्य… मराठमोळ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

एका मराठमोळ्या अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. तिने व्हॅनिटी व्हॅनमध्ये घडलेल्या विचित्र कृत्याबाबत खुलासा केला आहे. तिने एका मुलखातीमध्ये हा खुलासा केला आहे.

| Updated on: Jan 19, 2026 | 3:45 PM
1 / 6
अभिनेत्री पूजा हेगडेने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. पूजा ही साऊथ ते बॉलिवूडपर्यंत तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच चर्चेत राहते.

2 / 6
एकदा ती एका मोठ्या पॅन-इंडिया चित्रपटात काम करत होती. प्रोजेक्ट मोठा असल्याने तिचा उत्साह शिगेला होता, पण लवकरच हा उत्साह भीतीत बदलला. आता पूजासोबत नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया...

3 / 6
पूजाने एका मुलाखतीत सांगितले की, शूटिंगदरम्यान तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये एक सह-कलाकार (हिरो) अनपेक्षितपणे आणि परवानगीशिवाय घुसला. त्याने तिच्यासोबत अश्लील आणि असभ्य वर्तन केले, ज्यामुळे ती खूप अस्वस्थ आणि असुरक्षित झाली.

4 / 6
शेवटी पूजाने आपला संयम गमावला आणि त्याला जोरदार धक्का देऊन, मार देऊन व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर काढले. तो ताबडतोब तिथून निघून गेला.

5 / 6
या घटनेनंतर पूजाने ठाम निर्णय घेतला की, ती त्या अभिनेत्यासोबत कधीही काम करणार नाही. त्यामुळे तिचे उर्वरित सीन बॉडी डबलच्या मदतीने पूर्ण करण्यात आले. पूजाने ही घटना शेअर केली असली तरी तिने त्या सह-कलाकाराचे नाव उघड केलेले नाही.

6 / 6
सध्या पूजा हेगडे 'जय नायकन' या चित्रपटात थलापती विजयसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा सिनेमा २६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे. पूजाने 'मोहनजो दारो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर राधे श्याम, सर्कारू, वैकुंठापुरमुलू सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांत तिच्या अभिनयाची छाप पडली आहे.