श्रीदेवीचं 4 मिनिट 49 सेकंदांचं ते गाणं, बोल ऐकताच ढसाढसा रडतात तरुण, 34 वर्षांनी आजही तेवढंच प्रसिद्ध!
अभिनेत्री श्रीदेवीचे हे गीत आजही तेवढ्याच आवडीने ऐकले जाते. प्रेम, विरह यांनी ओतप्रोत असलेलं हे गीत ऐकून आजही अनेकांचे डोळे ओले होतात. म्हणूनच तीन दशकं होऊनही हे गाणं तेवढंच ताजं वाटतं.

श्रीदेवी ही अशी एक अभिनेत्री होऊन गेली, जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण बॉलिवुडवर राज्य केले. तिने अभिनय केलेल्या अनेक चित्रपटांनी अक्षरश: छप्परफाड कमाई केली. तिच्या चित्राटातील काही गाणी आजही अनेकांना तोंडपाठ आहेत.

श्रीदेवीने नव्वदचे दशक चांगलेच गाजवले. त्या काळातील तिच्या चित्राटांत अनेक प्रसिद्ध गाणे आहेत. यातीलच एक गाणे आजही तेवढ्याच आवडीन ऐकले जाते. हे गाणे ऐकून काही लोकांचे डोळे तर चिंब होतात. प्रेम, विरहाने ओतप्रेत असलेलं हे गाणं चांगलंच प्रसिद्ध आहे.

साधारण 34 सालापूर्वी तू ना जा मेरे बादशाह हे गाणे आले होते. खुदा गवाह या चित्रपटातील हे गीत असून ते आवडीने ऐकले जाते. या गाण्यात श्रीदेवी आणि दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आहेत. अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये हे गाणे आवर्जुन पाहायला मिळते.

हे गीत 4 मिनिटे आणि 29 सेकंदांचे आहे. या गाण्यातील संगीत, गायन मनाचा ठाव घेणारे आहे. कुणी याला विरहगीत म्हणतं तर कोणी याला प्रेमभावनेने ओथंबलेले गीत आहे, असे सागतं. त्यामुळेच या गीताची आजही तेवढीच लोकप्रियता आहे.

या गीतामध्ये श्रीदेवीने केलेला अभिनयही पाहण्यासारखा आहे. आपल्या प्रियकराला ती मला सोडून नको जाऊ असे आर्जव ती करताना दिसतेय. तर या गीतात अमिताभ बच्चनही मी काहीही झालं तरी परत येईल, असे सांगत मला जाण्यासाठी परवानगी दे असं बोलताना दिसतोय. म्हणूनच हे गाणे आजही लोकप्रिय आहे.