Shreyas Iyer : पोरांनो तयारीला लागा! न्यूझीलंडला पाणी पाजलं तरी श्रेयस नाराज, कॅप्टनने पुढचं मिशन सांगितलं
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. सामना संपल्यानंतर श्रेयस अय्यरने युवा खेळाडूंचं कौतुक करत संघाच्या ताकदीबाबत मोठं विधान केलं. नेमकं काय म्हणाला अय्यर?

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने अडचणीतून बाहेर पडत शानदार विजय मिळवला. 112 धावांत 6 विकेट्स गमावल्यानंतरही भारताने सामन्यात पुनरागमन केले. या विजयानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी आणि नमन धीर यांच्यासह न्यूझीलंडच्या फिरकीपटूंचेही कौतुक केले. सामन्यानंतर अय्यर नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...
तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांची जिद्दीचं यावेळी त्याने कौतुक केलं. श्रेयस अय्यरने दोघांच्या खेळाचे कौतुक केले. संघाच्या विकेट्स पडत असताना सामना हातातून निसटत असल्याचे वाटले, पण या दोघांनी जिद्दीने खेळ करत पुनरागमन केले असं अय्यर म्हणाला.
नमन धीरच्या अष्टपैलू कामगिरीचे कौतुक करताना अय्यर म्हणाला की, नमन धीरने अखेरच्या टप्प्यात आक्रमक फलंदाजी केली. तो चांगला गोलंदाज असून त्याचे क्षेत्ररक्षणही उत्कृष्ट आहे, त्यामुळे संघाला त्याच्याकडून चांगले योगदान मिळते.
दरम्यान, अय्यरने यावेळी न्यूझीलंडच्या फिरकीपटूंचे कौतुक केले मिचेल सँटनर आणि मायकल ब्रेसवेल यांनी मधल्या षटकांत भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्यांच्या गोलंदाजीविरुद्ध मोठे फटके मारणे सोपे नव्हते, असे अय्यरने यावेळी मान्य केले.
धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला अनेक निर्धाव चेंडू खेळावे लागले, त्यामुळे आवश्यक धावगती वाढली. चौकार मारण्याच्या अधिक संधी मिळाल्या असत्या, तर सामना सहज जिंकता आला असता, असे अय्यरने सांगितले.
दरम्यान, न्यूझीलंडला दोन सामन्यात हरवूनही अय्यर समाधानी नाही. त्याने सर्व खेळाडूंना या विजयाचं श्रेय दिलं पण मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळाली असून,अजून 3 सामने बाकी असल्याने काम अर्धेच झाले आहे, असंही यावेळी अय्यरने म्हटलं आहे.