बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री, जिला नवऱ्याला द्यावी लागली 93 लाखांची पोटगी, चाळीमध्ये राहत होती अभिनेत्री

टीव्ही इंडस्ट्रीमधील या अभिनेत्रीने 5 वर्षे लढली कायदेशीर लढाई. मात्र, शेवटी तिला घटस्फोटानंतर नवऱ्याला द्यावी लागली 93 लाख रुपयांची पोटगी.

| Updated on: Apr 03, 2026 | 3:30 PM
1 / 6
सध्या मोठ्या प्रमाणात घटस्फोटाच्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच आता इंडस्ट्रीमधील सौंदर्य आणि अभिनयाने चर्चेत असणारी अभिनेत्री चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती श्वेता तिवारी आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात घटस्फोटाच्या घटना घडताना दिसत आहेत. अशातच आता इंडस्ट्रीमधील सौंदर्य आणि अभिनयाने चर्चेत असणारी अभिनेत्री चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती श्वेता तिवारी आहे.

2 / 6

या चर्चेत अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा अनुभवही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. श्वेता तिवारीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव सांगताना एक धक्कादायक खुलासा केला होता. तिच्या मते, घटस्फोटानंतर तिला एलिमनी मिळाली नाही, उलट तिलाच तिच्या माजी पतीला एलिमनी द्यावी लागली.

3 / 6

श्वेता तिवारीने 1998 मध्ये राजा चौधरी याच्याशी विवाह केला होता. मात्र, वैवाहिक आयुष्यातील वादांमुळे दोघांनी घटस्फोट घेतला. तब्बल पाच वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर त्यांचा घटस्फोट झाला. या प्रक्रियेत श्वेताला सुमारे 93 लाख रुपयांची मालमत्ता गमवावी लागली.

4 / 6

तिने आपल्या माजी पतीला एक फ्लॅट एलिमनी म्हणून दिल्याचेही तिने सांगितले. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण तेव्हा आले, जेव्हा राजा चौधरी यांनी ही मालमत्ता त्यांची मुलगी पलक तिवारी हिच्या नावावर करण्यास नकार दिला.

5 / 6

त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'तू मला फ्लॅट दे, मी तुला घटस्फोट देतो.' इतकेच नाही तर त्यांनी मालमत्तेसाठी मुलीचा त्याग करण्याची तयारी दर्शवली होती असेही समोर आले.

6 / 6

श्वेता तिवारीने पुढे सांगितले की, तिच्या कुटुंबीयांचा या विवाहाला सुरुवातीपासूनच विरोध होता. कारण हा इंटरकास्ट विवाह होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us