घटस्फोटानंतर पुन्हा होणार खान कुटुंबाची सून? लग्नात दिसले एकत्र; चर्चांवर सोडलं मौन

सोहैल खान आणि सीमा सजदेह यांना पुण्यातील एका लग्नसोहळ्यात एकत्र पाहिलं गेलं. तेव्हापासून या दोघांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर अखेर सीमाने मौन सोडलं आहे. ती नेमकं काय म्हणाली, ते वाचा..

| Updated on: Jun 11, 2026 | 12:41 PM
1 / 5
अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्यानंतर 2022 मध्ये जेव्हा सोहैल खान आणि सीमा सजदेह यांनी लग्नाच्या 24 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला, तेव्हा खान कुटुंबीयांसोबतच सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. या दोघांनी वैचारिक मतभेदांमुळे विभक्त होत असल्याचं स्पष्ट केलं होतं.

2 / 5
काही दिवसांपूर्वी सोहैल खान आणि त्याची पूर्व पत्नी सीमा सजदेह यांना पुण्यातील एका लग्नसमारंभात एकत्र पाहिलं गेलं. तेव्हापासून हे दोघं पुन्हा एकत्र आले की काय, अशा चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर अखेर सीमाने मौन सोडलं आहे. सोहैल आणि सीमा यांना दोन मुलं आहेत.

3 / 5
याविषयी सीमा म्हणाली, "माझं सोहैलशी लग्न झालं होतं आणि आमची दोन मुलं आहेत. सोहैल माझ्या मुलांचा पिता आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही नेहमीच एकत्र असू आणि हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे. लोकांना ही गोष्ट का समजत नाही? त्यांना इतकंच समजतं की जेव्हा घटस्फोट होतो तेव्हा तुम्ही एकमेकांचे शत्रू बनता. कोणताच घटस्फोट सहजसोपा नसतो."

4 / 5
"आमची दोन मुलं आहेत आणि जरी आम्ही एकमेकांना आवडत असू किंवा नसू तरी मुलांखातर आम्हाला एक कुटुंब म्हणून राहावं लागेल. त्यामुळे जेव्हा लोक म्हणतात की, अरे हे दोघं पुन्हा एकत्र आले, तेव्हा मला ते ऐकायलाच खूप विचित्र वाटतं. अशा वेळी मी तरी काय करणार", असं ती पुढे म्हणाली.

5 / 5
सोहैल खान आणि सीमा सजदेह यांनी 1998 मध्ये पळून लग्न केलं होतं. सीमाच्या कुटुंबीयांना सोहैलसोबतचं तिचं नातं मान्य नव्हतं. त्यांना फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित कुटुंबात मुलीचं लग्न करून द्यायचं नव्हतं. तरी सीमाने तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन पळून लग्न केलं होतं. या दोघांना योहान आणि निर्वाण ही दोन मुलं आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us