Sonakshi Sinha : झहीर इक्बालशी लग्न झाल्यावर इंटिमेट सीन्सवर बंदी ? सोनाक्षी सिन्हा नवऱ्याबद्दल स्पष्टच बोलली..

लग्न झाल्यामुळे आता सोनाक्षीने पडद्यावर बोल्ड किंवा इंटीमेट सीन्स करण्यास नकार दिला, असं अनेकांनी बोलून दाखवलं. मात्र आता यावर मौन सोडत खुद्द सोनाक्षी सिन्हा हिनेच स्पष्टीकरण दिलंय.

| Updated on: May 28, 2026 | 1:21 PM
1 / 7
दबंग मूव्हीतून सलमान सोबत पदार्पण करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बरीच लोकप्रिय आहे. पण सध्या ती तिच्या कामामुळे किवा चित्रपटांमुळे नव्हे तर पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. दोन वर्षांपूर्वी, जून 2024 मध्ये तिने जहीर इक्बालशी लग्न केलं. मात्र आंतरधर्मीय लग्नामुळे ती अनेकदा ट्रोल झाली.  अशातच आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लग्न झाल्यामुळे आता सोनाक्षीने पडद्यावर  इंटीमेट सीन्स किंवा बोल्ड करण्यास नकार दिला, अशी चर्चा आहे. यावर सोनाक्षीनेच थेट उत्तर दिलंय.(Photo : Social Media / Instagram)

2 / 7

सध्या सोनाक्षी सिन्हा तिच्या 'सिस्टम' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिका देखील आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचदरम्यान सोनाक्षीने इंटिमेट सीनबज्दल सुरू असलेल्या अफवांवर उत्तर दिलं.

3 / 7

एका मुलाखतीत ती स्पष्टपणे बोलली. इंटिमेट सीनबद्दल माझी काही तत्त्वें आहेत. या निर्णयाचा माझ्या लग्नाशी काहीही संबंध नाही असं सोनाक्षीने स्पष्ट केलं.

4 / 7

इंडिया टुडेशी झालेल्या संभाषणादरम्यान सोनाक्षी म्हणाली, "इंटीमसीबद्दल, माझे नियम लग्नाआधीच ठरलेल होते. लग्नानंतर ते बदलले आहेत असं नाही." माझ्या करिअरमध्ये मी काय करायचं आणि काय नाही, हे मी लग्न होण्याच्या खूप आधीच ठरवलं होतं. लग्नामुळे माझ्या निर्णयात बदल नाही. एका विशिष्ट मर्यादेपलीकडील इंटिमसी मुळे मी नेहमीच अस्वस्थ होते. नेॉ मी अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. मी आजही माझ्या शब्दांवर ठाम आहे." असं सोनाक्षीने सांगितलं.

5 / 7

मला माझी तत्त्वं बदलावी लागतील असे वाटत नाही. कधीकधी ही (इंटिमेट) दृश्यं अनावश्यकपणे चित्रित केली जातात. खळबळ निर्माण करण्यासाठीच ते शूट केले जातात. बहुतेक वेळा, अशी दृश्ये आवश्यकता नसताना चित्रित केली जातात. जिथे गरज असते, तिथे तुम्ही दिग्दर्शकाशी बोलून असा मार्ग काढू शकता, जो सर्वांसाठी सोयीस्कर असेल, असं सोनाक्षी म्हणाली.

6 / 7

सोनाक्षी नेहमीच पडद्यावर इंटिमसी दाखवण्याच्या विरोधात होती. ती हलके फुलके. रोमँटिक दृश्यां जरूर करते. तिचे बहुतेक चित्रपट स्वच्छ आणि सभ्य असतात.

7 / 7

सोनाक्षीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर दोन वर्षांपूर्वी, 23 जून 2024 रोजी तिने झहीर इक्बालशी लग्न केलं. आठ वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांनी रजिस्टर मॅरेज केलं. या जोडीची केमिस्ट्री , त्याचे व्हिडीओ, हलकेफुलके क्षण चाहत्यांना आवडतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us