सलमान, अक्षय-अजयसोबत सुपरहिट चित्रपट देऊनही बनली नाही टॉप अभिनेत्री, आज कोट्यवधींची मालकीण

बॉलिवूडमधील तीन मोठ्या कलाकारांसोबत सुपरहिट चित्रपट देऊन देखील ही अभिनेत्री बनली नाही टॉप अभिनेत्री. पण आज आहे कोट्यवधींची मालकीण.

| Updated on: Jun 01, 2026 | 1:12 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची कन्या असलेल्या सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये दमदार सुरुवात केली होती. मात्र करिअरच्या पुढील टप्प्यात तिला अपेक्षित यश मिळू शकले नाही.

2 / 5
2 जून 1987 रोजी पटना येथे जन्मलेल्या सोनाक्षीने वयाच्या 23व्या वर्षी 'दबंग' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान मुख्य भूमिकेत होता. चित्रपट प्रचंड गाजला आणि बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. सोनाक्षीच्या अभिनयालाही प्रेक्षकांची पसंती मिळाली.

3 / 5
पदार्पणानंतर तिने अक्षय कुमारसोबत 'राउडी राठोड' आणि अजय देवगनसोबत 'सन ऑफ सरदार' या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. सलग तीन मोठ्या सुपरस्टार्ससोबत हिट चित्रपट दिल्यामुळे ती बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री बनेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

4 / 5
मात्र सुरुवातीच्या यशानंतर सोनाक्षीच्या कारकिर्दीला हवा तसा वेग मिळाला नाही. अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. डबल XL, लाल कप्तान, खानदानी शफाखाना, कलंक, हैप्पी फिर भाग जाएगी, वेलकम टू न्यूयॉर्क, नूर, अकीरा, तेवर, बुलेट राजा, लूटेरा आणि जोकर यांसारख्या अनेक चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

5 / 5
दुसरीकडे, तिच्या यशस्वी चित्रपटांच्या यादीत सन ऑफ सरदार, दबंग आणि राउडी राठौर, दबंग 2, दबंग 3, हॉलीडे आणि आर.....राजकुमार यांचा समावेश आहे. फिल्मी पार्श्वभूमी आणि दमदार पदार्पण असूनही सोनाक्षीला वडिलांप्रमाणे मोठे आणि सातत्यपूर्ण यश मिळाले नाही.

Follow Us