18-20 तास उपवास, 51 वर्षांच्या सोनाली बेंद्रेचं फिटनेस सीक्रेट

Sonali Bendre Fitness: चौथ्या स्टेजच्या मेटास्टॅटिक कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केलेल्या सोनाली बेंद्रेनं तिचं फिटनेस रुटीन सांगितलं आहे. सोनालीचा डाएट कसा आहे, फिट राहण्यासाठी ती काय करते, त्याबद्दल जाणून घ्या..

| Updated on: Jul 15, 2026 | 12:20 PM
1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे वयाच्या 51 व्या वर्षीही तिच्या दमदार फिटनेसने सर्वांचं लक्ष वेधून घेते. सोनालीचं सौंदर्य आणि फिटनेस आजही तरुण अभिनेत्रींनाही मागे टाकणारं आहे. सुंदर चेहरा आणि टोन्ड फिगरसाठी सोनाली तिच्या डाएटची विशेष काळजी घेते. तिचं फिटनेस सीक्रेट काय आहे, ते जाणून घेऊयात..

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे वयाच्या 51 व्या वर्षीही तिच्या दमदार फिटनेसने सर्वांचं लक्ष वेधून घेते. सोनालीचं सौंदर्य आणि फिटनेस आजही तरुण अभिनेत्रींनाही मागे टाकणारं आहे. सुंदर चेहरा आणि टोन्ड फिगरसाठी सोनाली तिच्या डाएटची विशेष काळजी घेते. तिचं फिटनेस सीक्रेट काय आहे, ते जाणून घेऊयात..

2 / 6

सोनाली बेंद्रे अर्ध्यापेक्षा जास्त दिवस उपाशीच राहते. ती जेवणसुद्धा प्रमाणातच असतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनालीने तिच्या डाएट आणि फिटनेस रुटीनविषयी खुलासा केला आहे. सोनालीने सांगितलं की, ती दररोज 18 ते 20 तास इंटरमिटेंट फास्टिंग करते.

3 / 6

म्हणजेच सोनाली दिवसातील बहुतांश वेळ काहीच न खाता राहते. तिच्या जेवणाची वेळ ही निश्चित असते. दिवसातून फक्त दीड वेळा किंवा कधी-कधी दोन वेळाच ती जेवते. बऱ्याच अंशी तिचं रुटीन अशाच पद्धतीचं असतं. तसंच जेवणाच्या प्रमाणाच्या बाबतही ती जागरुक असते. ताटात गरजेपुरतंच अन्न ती घेते.

4 / 6

अनेकांना जेवणाच्या मधल्या वेळेत काही ना काही हलकं-फुलकं खाण्याची सवय असते. मात्र सोनाली या सर्व गोष्टी आवर्जून टाळते. ती कमी पण विचारपूर्वक आणि संतुलित आहार घेते. माझ्यासाठी हेच सर्वोत्तम आहे, असं ती म्हणाली. काय खायचं यापेक्षा कधी जेवायचं याकडे इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये सर्वाधिक लक्ष दिलं जातं.

5 / 6

इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये जेवणाची आणि उपाशी राहण्याची वेळ निश्चित असते. यामुळे फिटनेसही राखता येतं आणि वजनही नियंत्रित करता येतं. सोनाली बेंद्रेनं पुढे असंही म्हटलंय की, "प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. त्यामुळे तुमच्या शरीरासाठी आणि लाइफस्टाइलसाठी जे योग्य असेल, तसंच डाएट फॉलो केलं पाहिजे."

6 / 6

सोनाली बेंद्रेनं कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना केला आहे. 2018 मध्ये तिला चौथ्या स्टेजच्या मेटास्टॅटिक कॅन्सरचं निदान झालं होतं. न्यूयॉर्कमध्ये दीर्घकाळ उपचार आणि केमोथेरपीनंतर तिने कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली. आजारपणानंतर सोनालीने दमदार कमबॅक केलं आहे. ओटीटी आणि टीव्ही शोजमध्ये ती सक्रिय आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us