Sonam Kapoor : डोहोळे जेवणाच्या फोटोंवरुन सोनम कपूर ट्रोल, दुसऱ्यांदा बनणार आई
Sonam Kapoor : सोशल मीडियावर सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यात तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसतोय. यात सोनम कपूरच्या ड्रेसपासून तिच्या घरचं डेकोरेशन खूपच सुंदर वाटतय. एक्ट्रेसच्या कुटुंबातील सदस्य आणि खास मित्र परिवार या कार्यक्रमाला उपस्थित होता.

Sonam Kapoor Baby Shower Photos : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या चित्रपटांसह पर्सनल लाइफमुळे सुद्धा चर्चेत असते. सध्या अभिनेत्री आपल्या आयुष्यातील सुंदर टप्प्यावर आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. डोहाळे जेवणाच्या फोटोंमध्ये सोनम कपूर खूप सुंदर दिसत आहे. ती बेबी बंप फ्लॉनट करताना दिसतेय.

या प्रसंगी सोनमने लाइट ग्रीन कलरचा लेहंगा परिधान केला होता. त्यावर एंब्रॉयडरी वर्क होतं. हेवी नेकलेस, झुमके स्टाइल ईयररिंग्स, बन हेअर स्टाइल आणि मेकअप सह आपल्या या लुकला क्लासी बनवलं होतं. हातात मॅचिंग बांगड्या भरल्या होत्या. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मॉम टू बी चा ग्लो स्पष्ट दिसतोय.

सोनम कपूर आणि तिचा नवरा आनंद अहूजा दोघे एकत्र बसून रीति-रिवाजाने पूजा करतायत. सोबतच करीना कपूर, अंशुला कपूर, अर्जुन कपूर, भूमि पेडणेकर आणि बॉलीवूड विश्वातील अनेक स्टार्स त्यांच्यासोबत होते. सगळेच या प्रसंगी सेलिब्रेट करताना दिसले.

अभिनेते अनुपम खरे सुद्धा या प्रसंगी उपस्थित होते. इन्स्टाग्राम स्टोरीवर सोनम सोबत फोटो शेअर करताना लिहिलं डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा. यावेळी सोनम सोबत पती आनंद सुद्धा तिथे होता. त्यावेळी आनंदची नजर सोनमवरच खिळलेली. त्याची नजर आपल्या पार्टनरवरुन हटतच नव्हती.

काही लोकांनी सोनम कपूरच्या बदलेल्या लूकवरुन तिला ट्रोल केलं. काहींनी तिला ओवरवेट म्हटलं. काहींनी तिला फॅशन सेन्सवरुन तिच्यावर टीका केली. पण सोनम कपूर स्वत: मात्र कॉन्डिफेंट वाटली. तिचे फोटो खूप छान होते.