52 वर्षे जुन रोमँटिक गाणं, जे पाहण्यासाठी महिला थिएटरमध्ये जायच्या, आजही हे गाणं महिला प्रचंड ऐकतात
52 वर्षांपूर्वीचं गाणं, महिलांना इतकं आवडलं की चित्रपट नाही तर गाणं बघण्यासाठी थिएटरबाहेर व्हायची गर्दी. आजही हे गाणं महिला प्रचंड ऐकतात.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार गाण्यांचा विषय निघाला की सर्वप्रथम आठवण येते ती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाची. त्यांच्या स्वरांमध्ये अशी जादू होती की प्रेम, विरह, वेदना, आनंद किंवा भावनांची प्रत्येक छटा श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचत असे. त्यांनी गायलेली अनेक गाणी आजही चाहत्यांच्या ओठांवर कायम आहेत.

अशाच एका गाण्याने 70 च्या दशकात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या गाण्यात मस्ती, रोमान्स आणि एका पत्नीची मनातील तक्रार अशा सर्व भावना सुंदरपणे व्यक्त झाल्या होत्या. विशेष म्हणजे हे गाणे आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

झीनत अमानने आपल्या ग्लॅमरस आणि बेधडक व्यक्तिमत्त्वामुळे वेगळीच ओळख निर्माण केली होती. 1974 साली प्रदर्शित झालेल्या 'रोटी कपड़ा और मकान' या चित्रपटातील ‘हाय हाय ये मजबूरी’ हे गाणे प्रचंड गाजले होते. पावसात चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात झीनत अमानचा रेन डान्स प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावणारा ठरला होता.

गाण्यात त्या पावसात मस्ती करताना दिसत होती तर मनोज कुमार यांच्यासोबतचा तिचा रोमँटिक अंदाजही चाहत्यांना खूप आवडला होता. गाणे रिलीज होताच ते चार्टबस्टर ठरले आणि अनेक प्रेक्षक केवळ हे गाणे पाहण्यासाठी चित्रपटगृहात जात असल्याचे म्हटले जाते.

या गाण्याची सर्वाधिक लोकप्रियता विवाहित महिलांमध्ये पाहायला मिळाली. गाण्यातील ‘तेरी दो टकिया की नौकरी, मेरा लाखों का सावन जाए…’ ही ओळ विशेष चर्चेत राहिली. कामाच्या व्यापामुळे पत्नीला वेळ देऊ न शकणाऱ्या पतींबद्दलची ही भावना अनेक महिलांना आपलीशी वाटली. त्यामुळे हे गाणे त्या काळात प्रत्येकाच्या ओठांवर होते.