Haaland: नॉर्वेचा स्टार फुटबॉलपटू एर्लिंग हालँडच्या नावाने ओळखली जाणार या देशातील 559 मुलं, कारण..
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एर्लिंग हालँडचा नॉर्वे संघ स्पर्धेतून आऊट झाला आहे. या स्पर्धेत हालँडने एकूण 7 गोल मारले आणि प्रवास संपला. त्याच्या कामगिरीमुळेत नॉर्वेचा संघ उपांत्यपूर्व फेरी गाठू शकला. पण आता एर्लिंग हालँड एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

फिफा वर्ल्डकप 2026 नॉर्वे संघाने जबरदस्त कामगिरी केली. पण त्यांचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला आणि स्पर्धेतून आऊट झाले. पराभवानंतरही स्टार स्ट्रायकर एर्लिंग हालँड चर्चेत आला आहे. (Photo: Getty Images)

एर्लिंग हालँडने या स्पर्धेत इतकी लोकप्रियता मिळवली की आता त्याच्या नावाने पेरूत 559 मुलं ओळखली जाणार आहेत. नवजात 559 बालकांना एर्लिंग हालँडचं नाव देण्यात आलं आहे. (Photo: Getty Images)

पेरूच्या राष्ट्रीय नोंदणी कार्यालयात रेनिएकच्या मते, देशात 468 नवजात बालकांची नावं हालँड म्हणून नोंदवली आहेत. तर 91 नवजात बालकांची नावं एर्लिंग हालँड म्हणून नोंदवली आहेत. (Photo: Getty Images)

नाव नोंदवणाऱ्या रेनिएक एजेंसीच्या मते, एर्लिंग हालँडशी प्रभावित होत नवजात बालकांची नावं ठेवण्यात आली आहेत. बहुतांश नोंदणी ही फिफा वर्ल्डकप 2026 सुरू होणाच्या आठवडाभरात आली होती. (Photo: Getty Images)

एर्लिंग हालँडने फिफा वर्ल्डकप 2027 स्पर्धेत एकूण 7 गोल मारले आहे. एर्लिंग गोल्डन बूटच्या शर्यतीत होता. पण उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडने नॉर्वेला 2-1ने पराभूत केलं. त्यामुळे एर्लिंगचं स्वप्न भंगलं. (Photo: Getty Images)