FIFA World Cup 2026 जेतेपद अर्जेंटीनाला मेस्सी नाही तर हा खेळाडू मिळवून देणार, 100 टक्के विजयाची हमी
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा विजेता आता एक सामना दूर आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. असं असताना अर्जेंटीनाच्या एका खेळाडूची जोरदार चर्चा रंगली आहे.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी अंतिम सामन्यात अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे साऱ्या क्रीडाविश्वाचं लक्ष लागून आहे. गतविजेता अर्जेंटीना संघ जेतेपदाचा मानकरी मानला जात आहे. कारण या संघात एक खेळाडू असा की त्याने एकही सामना गमावलेला नाही. (Photo: Getty Images)

अर्जेंटीनाचा हा खेळाडू कर्णधार लियोनल मेस्सी नाही तर मिडफिल्डर एलेक्सिस मॅकएलिस्टर आहे. मॅकएलिस्टरने वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात एकही सामना गमावलेला नाही. त्याने या स्पर्धेत जितके सामने खेळले तितक्या सामन्यात विजय मिळवला आहे. (Photo: Getty Images)

मॅकएलिस्टरने आतापर्यंत फिफा वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले आहेत. त्यात 11 सामन्यात अर्जेटीनाने विजय मिळवला आहे. तर दोन सामने बरोबरीत सुटले. पण यातही पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटीनाने विजय मिळवला आहे. (Photo: Getty Images)

कतरमध्ये खेळल्या गेलेल्या 2022 फिफा वर्ल्डकप स्पर्धेत मॅकएलिस्टर हा संघाचा भाग होता. तेव्हा त्याने उपांत्य फेरीत एक गोल मारला होता. याच वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटीनाने जेतेपदाला गवसणी घातली होती. (Photo: Getty Images)

अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यातील अंतिम लढतीत मॅकएलिस्टर समोर स्पेनच्या फाबियन रुइजचं आव्हान असणार आहे. रुइजच्या नावावरही खास विक्रम आहे. त्याने स्पेनसाठी 49 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यात एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे अंतिम फेरीत कोणाचा विक्रम मोडतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.(Photo: Getty Images)