35 सामन्यांचे 130 कोटी रुपये..! टीम इंडियाच्या सामन्यासाठी कोण देणार इतके पैसे?

भारतीय क्रिकेट संघाकडून बीसीसीआय पुन्हा मोठी रक्कम कमावणार आहे. यासाठी तीन मोठ्या कंपन्यांसोबत करार झाला आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या तिजोरीत भर पडणार आहे.

| Updated on: Sep 08, 2026 | 3:41 PM
1 / 5
टीम इंडियाच्या सामन्यांमुळे बीसीसीआयचं भलं होणार आहे. कारण बीसीसीआयने तीन मोठ्या कंपन्यांसोबत करार केला आहे.  टीम इंडियाच्या देशांतर्गत द्विपक्षीय सामन्यांसाठी कंपन्या कोट्यवधि रुपये बीसीसीआयला देणार आहेत. (PC-PTI)

टीम इंडियाच्या सामन्यांमुळे बीसीसीआयचं भलं होणार आहे. कारण बीसीसीआयने तीन मोठ्या कंपन्यांसोबत करार केला आहे. टीम इंडियाच्या देशांतर्गत द्विपक्षीय सामन्यांसाठी कंपन्या कोट्यवधि रुपये बीसीसीआयला देणार आहेत. (PC-PTI)

2 / 5

कँपा कोला, एसबीआय लाईफ आणि चॅट जीपीटी या तीन कंपन्या आहेत. या तीन कंपन्यांनी बीसीसीआयसोबत भारतीय क्रिकेट सामन्यांसाठी करार केला आहे. (PC-PTI)

3 / 5

कँपा कोला टीम इंडियाला द्विपक्षीय सामन्यासाठी 1.31 कोटी रुपये देणार आहे. एसबीआय लाइफ 1.2 कोटी प्रत्येक सामन्यासाठी मोजणार आहे. तर चॅट जीपीटी प्रत्येक सामन्यासाठी 1.2 कोटी देणार आहे. (PC-PTI)

4 / 5

या तीन कंपन्यांकडून प्रत्येक सामन्यासाठी एकूण 3.71 कोटी बीसीसीआयला मिळणार आहे. म्हणजेच बीसीसीआयच्या 35 सामन्यांमधून 130 कोटी रुपये मिळतील. (PC-PTI)

5 / 5

भारतीय संघाचा या तीन कंपन्यांसोबत 2028 पर्यंत करार झाला आहे. या दरम्याने भारताला ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वेसोबत मालिका खेळायची आहे. वर्ष 2028 मध्येही काही द्विपक्षीय मालिकांचा यात समावेश असेल. (PC-PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us