PHOTOS: अभिनेता रणवीर सिंगने धोनीला मारली मिठी, मग पायाजवळ बसूनही केला फोटो शेअर

नुकत्याच बीसीसीआयने सप्टेंबरमध्ये सुरु होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या तारखा जाहिर केल्या. त्यामुळे धोनी चाहत्यांना पुन्हा एकदा धोनीचा जलवा मैदानावर पाहायला मिळणार आहे.

1/5
आयपीएल 2021 स्थगित झाल्यानंतर पहिल्यांदाच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि श्रेयस अय्यर मैदानावर खेळताना दिसले. पण हे दोघेही मैदनावर क्रिकेट नाही तर फुटबॉल खेळण्यासाठी एकत्र आले होते. मुंबईच्या वांद्रे येथे आयोजित ऑल-स्टार्स फुटबॉलच्या सराव सामन्यासाठी धोनी, अय्यर सह अनेक बॉलीवुड अभिनेतेही होते. ज्यात सुपरस्टार रणवीर सिंगही मैदानात उपस्थित होता.

2/5
एमएस धोनी आणि श्रेयस अय्यर 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरु होणाऱ्या आयपीएल 2021 मध्ये खेळताना दिसतील. युएईमध्ये 27 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 31 सामने खेळवले जातील.

3/5
धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून श्रेयसही सध्या संघात नाही. त्यामुळे हे दोघेही आगामी आयपीएलपूर्वी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी फुटबॉल सामना खेळत आहेत.

4/5
समोर आलेल्या माहितीनुसार एका चॅरिटी मॅचदरम्यान रणवीर आणि धोनी एका संघात दिसून आले. यावेळी दोघांनी एकमेंकाना मिठी मारली रणवीरने त्याच्या इन्स्टा अकाउंटवर फोटोही शेअर केले.

5/5
सामन्यानंतर रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला त्याचा आणि धोनीचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये तो धोनीला मिठी मारताना तसेच त्याच्या पायाजवळ बसलेलाही दिसून येत आहे. यावेळी रणवीरने धोनीला मोठा भाऊ म्हणत. 'कायम मोठ्या भावाच्या पायाशी'असं कॅप्शनही दिलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI