IPL 2027: चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड? पडद्यामागे नेमकं चाललंय काय?

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी फ्रेंचायझींची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या स्पर्धेसाठी पाच महिन्यांचा अवधी शिल्लक असून फ्रेंचायझींचा जोर बैठका सुरू आहेत. असं असताना चेन्नई सुपर किंग्सच्या हेड कोचपदी कोण? असा प्रश्न आहे. राहुल द्रविड यांच्याशी चेन्नई सुपर किंग्सने खरंच संपर्क साधला आहे का?

| Updated on: Sep 01, 2026 | 4:56 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेत गेल्या काही वर्षात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. असं असताना हेड कोच स्टीफन फ्लेमिंग याने संघाची साथ सोडली आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं आहे. त्याच्या गैरहजेरीत चेन्नई सुपर किंग्सला मार्गदर्शन कोण करणार? असा प्रश्न आहे. (PC-PTI)

2 / 5
रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्सने रिक्त झालेल्या पदासाठी दोन दिग्गजांशी संपर्क साधला आहे. यात दिनेश कार्तिकसह राहुल द्रविडचं नावही आहे.  मॅथ्यू हेडन यानेही या चर्चेबाबत खुलासा केला आहे. (PC-PTI)

3 / 5
चेन्नई सुपर किंग्सला जेतेपदाची चव चाखून देणाऱ्या संघात मॅथ्यू हेडने होता. त्यामुळे त्याच्या म्हणण्यात काही तरी तथ्य असणं सहाजिकच आहे.  हेडनच्या मते, चेन्नई सुपर किंग्सने व्यवस्थापनाने राहुल द्रविडला हेड कोच करण्यासाठी  प्रस्ताव दिला आहे. यात दिनेश कार्तिकचं नावही आहे. (PC-Gujarat Titans Twitter)

4 / 5
राहुल द्रविड आणि दिनेश कार्तिक या दोघांनी आयपीएल संघासाठी जबरदस्त काम केलं आहे. दिनेश कार्तिक आरसीबीचा मेंटॉर आणि बॅटिंग कोच आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली  आरसीबीने सलग दोनदा जेतेपद मिळवलं आहे. (PC-PTI)

5 / 5
राहुल द्रविडने आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्ससोबत काम केलं आहे. इतकंच काय तर टीम इंडियाचा हेड कोच म्हणून भूमिका बजावली आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला होता. (PC-PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us